नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो व्यक्ती कोणासोबत जास्त वेळ घालवतो, कशा लोकांसोबत तो जास्त राहतो यावरून बऱ्याचदा त्याचा स्वभाव व संस्कार ओळखले जाऊ शकतात. व्यक्ती कोणत्याही राशीचा असो त्याचे संबंध संपूर्ण 12 राशींसोबत येतात.
व्यक्तीची कुठली रास आहे त्यावरून सुद्धा व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. व्यक्ती मध्ये सर्व चांगले गुण असतीलच असे नाही. त्या व्यक्ती मध्ये दुर्गुण देखील असू शकतात. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो.
काही व्यक्ती त्याच्या गुणांमुळे ओळखले जातात तर काही व्यक्ती अवगुणांमुळे ओळखले जातात. ज्योतिषशास्त्र असे मानते कि या 5 राशी खूपच गर्वाने भरलेल्या आणि अहंकारी मानल्या जातात. समोरच्या व्यक्तीचा अपमान करताना मागे पुढे बघत नाहीत.
मेष रास
मेष राशीचे व्यक्ती संयम शून्य मानले जातात. यांच्यात सयंम नावाची गोष्ट अजिबात नसते. स्वतःच्या हातून चूक घडली तरी लवकर मान्य करत नाहीत. त्यांची चूक तुम्ही दाखवून दिली कि लगेच त्यांचा अहंकार आडवा येतो.
हे लोक धाडसी स्वभावाचे असतात. आलेली परिस्थिती व्यवस्थितपणे सांभाळून घेतात. संकटांना न घाबरता धाडसाने त्याचा सामना करतात. परंतु या व्यक्ती अपमान करण्यात सुद्धा पटाईत असतात.
मिथुन रास
या राशीच्या व्यक्तीमध्ये खूप टॅलेंट असते. मिथुन राशीच्या व्यक्ती खूपच आत्मविश्वासू असतात. परंतु समोरची व्यक्ती आपल्या पेक्षा कमजोर आहे असे त्यांना सतत वाटत असते. ते बोलत असताना तुम्ही त्यांना मध्येच थांबवले तर त्यांना लगेच राग येतो.
मीच बरोबर आहे हे पटवून देताना भांडण करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. अशा अहंकारी स्वभावामुळे बऱ्याचदा नाती त्यांच्यापासून दुरावतात. अनेक चांगल्या गोष्टी यांच्यात असून सुद्धा अहंकारी वृत्तीचे यांना मानले जाते.
सिंह रास
आपल्या वागण्यातून समोरच्याचे लक्ष वेधून घेणे यांना चांगले जमते. मोठेपणा आणि दिखावा करणे यांना फार आवडते. यांच्या मनाविरुद्ध तुम्ही वागलात तर लगेच भावनिक होतात.
ज्योतिषशास्त्रा नुसार सिंह राशीला अहंकारी रास मानले गेले आहे. याच अहंकारामुळे नातेवाईक, मित्र मैत्रिणी एवढेच नव्हे तर घरातील सदस्य देखील दुरावतात. राग आला कि मागचा पुढचा विचार न करता बोलतात.
वृश्चिक रास
या राशीचे लोक फारच मेहनती असतात. स्वतःच्या बळावर आणि कष्टावर सर्व काही मिळवतात. पण हे लोक अहंकारी स्वभावाचे असतात. अहंकार म्हणजे यांना त्यांचा प्लस पॉईंट वाटतो.
त्यांच्याशी बोलताना तुम्ही सहज एखादी चूक त्यांना दाखवून दिलीत तर लगेच तुमच्यावर रागावू शकतात. त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या त्यांना अजिबात सहन होत नाहीत.
मकर रास
हे लोक जे निर्णय घेतात ते बऱ्याचदा चुकीचे ठरतात कारण अहंकार. अहंकाराच्या बाबतीत हि रास फार आघाडीवर आहे. या राशीचे लोक मी म्हणजे सर्वस्व असा दृष्टिकोन ठेवणारे असतात.
त्यांची चूक दाखवून दिली कि लगेच त्यांचा पारा चढतो. स्वतः बद्दल कोणतीच नकारात्मक गोष्ट ऐकून घेत नाहीत. वेळ आली कि वाटेल ते बोलायला कमी करत नाहीत. अगदी तोंडात येईल ते बोलतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशी विषयी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.