नमस्कार मित्रानो,
मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील झाडू कुठे ठेवता? कारण या चुका जर तुम्ही करत असाल याचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. म्हणून या चुका अजिबात करू नका.
मित्रानो झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. म्हणून जेव्हा पण आपण नवीन झाडू आणतो तेव्हा त्याचे पूजन करतो. कारण हि झाडूच असते जी आपल्या घरातून कचऱ्यासोबतच नकारात्मकता, वाईट शक्ती सुद्धा बाहेर टाकत असते.
मित्रांनो या झाडूमुळेच आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. कारण झाडू आपल्या घराला स्वच्छ करण्याचे काम करता असते. तर मित्रांनो या झाडू संबंधी काही नियम आहेत त्याचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे.
मित्रांनो बरेच जण झाडू बेडखाली, पलंगाखाली ठेवतात. मित्रांनो हि सर्वात मोठी चूक आहे. पलंगाखाली झाडू चुकून सुद्धा ठेवू नये. जिथे चप्पल, बूट ठेवतो तिथे सुद्धा काही लोक झाडू उभी करून ठेवतात किंवा झोपवून ठेवतात.
मित्रानो हि सुद्धा चूक अजिबात करायला नाही पाहिजे. पलंगाखाली, चपलांच्या बाजूला, पुसण्याचे कापड अशा ठिकाणी झाडू ठेवू नका. झाडू अशा जागेवर ठेवा जिथे स्वछता आहे आणि बाहेरील व्यक्ती घरात आल्यावर ती झाडू त्याला दिसता कामा नये.
घरातील सदस्यांचे चुकून सुद्धा झाडूला पाय लागता कामा नये याची काळजी घ्या. मित्रांनो झाडू कधीही उभी करून ठेऊ नये. म्हणजेच भिंतीला टेकून झाडू उभी करून ठेवू नये.
झाडू नेहमी झोपून आडवी करून ठेवायची असते. कपाट आणि भिंतीच्या गॅप मध्ये किंवा त्याच्या मागे सुद्धा झाडू ठेवू नये. झाडू तुम्ही सोफ्याखाली ठेवूशकता. किंवा अन्य घरातील ठिकाणी ठेऊ शकता.
मित्रांनो बरेच लोक कचरा काढतात आणि जमा झालेला कचरा एका बाजूला सारून त्यावरच झाडू ठेवून दुसऱ्या कामाला लागतात. मित्रांनो कचऱ्या सोबत झाडू कधीही ठेवू नका. कचऱ्याच्या डब्या सोबतच सुद्धा झाडू ठेवू नये.
लक्ष्मीचे स्वरूप त्या झाडूला मानले जाते. झाडू बाबतील या काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. झाडू उभी ठेवू नका, बेडखाली ठेवू नका, कपाटाला किंवा तिजोरीला लागून झाडू ठेवू नका.
तर मित्रांनो सांगितलेल्या गोष्टी अवश्य लक्षात घ्या आणि आजवर या चुका करत असाल तर इथून पुढे त्या चुका टाळा. तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याशिवाय राहणार नाही.
या गोष्टींचे पालन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा..
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.