नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अनेकांच्या घरी शिवलिंग असते, याचे पूजन कुणी देवघरात करतात, कुणी तुळशीजवळ सुद्धा करतात. भगवान भोलेनाथांची पूजा करून त्यांना अनेक भक्त प्रसन्न मरून घेतात.
शिव शंकर त्यांच्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. शास्त्रानुसार बऱ्याचदा शिवलिंगाच्या बाबतीत काही छोट्या छोट्या चुका आपण करत असतो. पण त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. त्यामुळे तुमच्याही घरी जर शिवलिंग असेल तर या चुका करू नका.
मित्रांनो ज्यांच्या घरी शिवलिंग आहे व रोज त्याची विधिवत पूजा होते, अशा ठिकाणी शिवाचा नेहमी वास असतो. त्यामुळे मोठं मोठे आ जार निघून जातात, मोठया अडचणी, संकटे दूर होतात. पण ही पूजा करताना काही गोष्टींचे पालन आपण करायला हवे.
शिवलिंग घरात नवीन आणल्यावर त्याची फक्त स्थापना करा व पूजा करा, प्राणप्रति ष्ठापना करू नये, शिवपूराण असे सांगते की शिवलिंगाची प्राणप्रति ष्ठापना फक्त मंदिरात केली जाते, घरात नाही.
शिवलिंग हे अतिशय संवेदनशील असते ज्यामुळे त्याची थोडी जरी मनोभावे पूजा केली तरी भरपूर पुण्यफल प्राप्त होते. तसेच जर तुम्हाला कमीत कमी सोमवारी देखील या शिवलिंगाची पूजा करणे जमत नसेल तर नक्कीच तुम्ही घरी शिवलिंग ठेवू नका, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
नर्मदेच्या काळ्या खडकांचे शिवलिंग अतिउत्तम मानले जाते. तसेच देवघरातील शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे असू नये. ज्यामुळे तुमच्या घरी त्रास होणार नाही.
आपल्या शिवपुराण नुसार शिवलिंगातुन सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते, त्यामुळे शिवलिंगावरती सातत्याने जलधारा असायला हवी.
हिंदू धर्म शास्त्रानुसार घरी शिवलिंग जर धातूचे हवे असेल तर सोने, चांदी अथवा तांब्याचे असावे. सोबतच नाग देखील असायला हवा.
घरी सुख, शांती हवी असेल तर भगवान शिव शंकराला एकट ठेवू नका. त्यामुळे त्यांचा परिवार एकत्र असणारा फोटो ठेवा. शिवाला लरीय असणारी पांढरी फुले, जलाभिषेक, बेल नेहमी वहा, केतकीची फुले किंवा तुळशीची पाने चुकूनही शिवाला अर्पण करू नये.
अजून एक चुकीची प्रथा म्हणजे तुळशीजवळ शिवलिंग ठेवले जाते, पुजले जाते. हे चुकीचे असून त्याची कधीही तिथे पूजा करू नका, तिथे शिवलिंग सारखा दिसणारा शालीग्राम म्हणजे विष्णू असतात व तुळशी सोबत पूजा केली जाते. त्यामुळे हे सर्व नियम तुम्हाला पाळणे होत असेल तरच घरी शिवलिंग आणा व नियमित पूजा करा अथवा त्याची हेळसांड होईल असे काही करू नका.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.