नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो भगवान श्री कृष्ण सांगतात कि जीवनातील संसारात सर्वात घट्ट कोणते नाते असेल तर ते पती आणि पत्नीचे आणि सर्वात कमकुवत कोणते नाते असेल ते सुद्धा पती आणि पत्नीचेच.
पती आणि पत्नीचे आवडी निवडी आणि विचार जुळले कि ते नातं घट्ट व्हायला वेळ लागत नाही. उलट जर पती पत्नी मध्ये कोणतेच गुण जुळले नाही तर दोघांचे जीवन भांडण, वादविवाद, सतत नैराश्य यातच निघून जाते.
मित्रांनो महाभारतानुसार धर्मराज युधिष्टीर यांना यक्ष ने काही प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न असा होता कि ईश्वराने पुरुषांसाठी बनवलेला सर्वात उत्तम मित्र कोण आहे? युधिष्टीर ने त्वरित उत्तर दिले होते कि त्याची पत्नीचं सर्वात उत्तम मित्र.
तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल कि नवरा बायको सार्वजनिक ठिकाणी भांडण करत असतात. सर्वांसमोर एकमेकांना बरे वाईट बोलत असतात. या उलट त्या दोघानी सर्वांसमोर एकमेकांची किंमत केली पाहिजे.
एकमेकांप्रती एकमेकांच्या मनात कितीही कटुता असली तरी सर्वांसमोर एकमेकांचा अपमान करू नये. ज्या घरात नेहमीच वाद विवाद होत राहतात तिथे अलक्ष्मीचा वास कायम राहतो.
सोबतच ज्या महिला आपल्या पतीच्या पाठीमागून त्याची निंदा करतात अशा घरातून लक्ष्मी निघून जाते. महिलांनी या गोष्टीची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
नवरा बायकोच्या नात्यात कुठल्याही प्रकारची लपवा छपवी नसावी. एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा किंवा एकमेकांना कमी लेखण्याची चूक बिलकुल करू नये. याउलट एकमेकांसोबत एकमेकांची मदत करत संसाराचा गाडा पुढे ढकलला पाहिजे.
शास्त्रानुसार महिलांनी पतीशिवाय पर पुरुषासोबत एकाच आसनावर किंवा एकाच वाहनावर कधीच बसले नाही पाहिजे. पतीने सुद्धा या गोष्टीची तितकीच काळजी घेणे महत्वाचे आहे.
शास्त्रानुसार पत्नीने पती जेवण करायच्या आधी जेवू नये. पतीच्या आधीच भोजन करणाऱ्या महिलांच्या पतिव्रता धर्माचा नाश होतो. या कारणामुळे घरात नकारात्मकता वाढते, परिणामी घरातून सुख शांती नष्ट होते.
माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी असे वाटत असेल तर पती पत्नीने एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना इज्जत देणे आवश्यक आहे.
ज्या महिला पती जेवल्या नंतर भोजन करतात अशा महिलांवर आई अन्नपूर्णा देवी नेहमीच प्रसन्न राहते. पतीने पत्नीवर किंवा पत्नीने पतीवर कधी संशय नाही घेतला पाहिजे. संशयामुळे परिवाराची वाट लागायला वेळ लागत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.