नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्त्री ही घरची लक्ष्मी असते. ती जर घरात सुखात असेल तर पुर्ण घर सुखी राहते. घरातील सर्व कामे स्त्रीया करत असतात, स्त्रीच घराच्या रक्षणासाठी, सुखासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करत असते.
मित्रांनो स्त्रियांच्या घरातील अस्तित्वामुळे माता लक्ष्मीचा घरात निवास राहतो. पण काही गोष्टी अशा आहेत त्यामध्ये जर चुक झाली तर त्याचे परिणाम पूर्ण घराला भोगावे लागतात.
या चुकांमुळे घरात दारिद्र्य येते. पैसा नाहक खर्च होतो. माता लक्ष्मी घरात वास करत नाही. परिणामी घरात पैशाची चणचण भासू लागते.
स्त्रीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून स्त्रीयांचा अपमान केल्यास तेथे लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरातील स्त्रीया आपल्या कार्यात निपुण असतात त्या घरात माता लक्ष्मी वास करते.
स्त्रीयांनी अशा काही गोष्टी करू नये, ज्या आपल्या हातून नकळत होत असतात, त्यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते.
महिलांनी रात्री झोपताना गॅ सवर खरखटे ठेऊ नये. रात्री जेवण झाल्यावर किचन मध्ये खरकटी भांडी कधीच ठेवू नये, त्याने घरातील पैसा कमी होतो, जर भांडी धुवायला जमत नसतील तर ती विसळून, खरकटे काढून फक्त पाण्याने धुवून ठेवावीत.
मित्रांनो आपल्या घरातील झाडूला कधी पाय लावू नका किंवा घर साफ करताना झाडू कोणाच्या पायाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. कारण झाडूमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते.
ज्यावेळी तुम्ही साफ सफाई कराल तेव्हा हा झाडू ही साफ करून ठेवा व तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी नैऋत्य दिशेला ठेवा. कारण बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या घरातील झाडू पाहताच त्यातील माता लक्ष्मी निघून जाते.
मित्रांनो त्याच प्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाला कधीच लाथ मारू नका, कारण तुमच्या घरातील सर्व धन याच दरवाजातून आत येत असते.
दरवाजा प्रमाणे घराचा उंबरठ्याला देखील सन्मान द्या आणि त्यावर बसून गप्पा मारू नये. रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करा.
मित्रांनो आठवड्यातून एकदा शुध्द समुद्री मिठाने घर स्वच्छ करून घ्या.
मित्रांनो काही महिलांना सवय असते की सूर्योदय होईपर्यंत झोपण्याची. त्याने घरातील सर्व ऊर्जा नकारात्मक होते. बऱ्याच स्त्रीयांना सवय असते की सायंकाळी आपले घर किंवा अंगण झाडून घेतात, पण हिंदु पुराणानुसार संध्याकाळी आपले घर किंवा अंगण झाडू नये.
रात्रीची वेळ ही झाडण्यासाठी अशुभ असते हे विज्ञानाच्या स्वरूपात पण सिद्ध झाले आहे.
मित्रांनो त्यामुळे घरातील स्त्रीयांनी वरील सर्व नियम पाळले, तर तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त होईल.
हे सर्व नियम फक्त स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनी सुद्धा याचे पालन करणे आवश्यक आहे. तरच घरात बरकत येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.