रोज सकाळी ज्या महिला करतात ही 4 कामे, त्या घरात महालक्ष्मी देते सुख व धन…

0
497

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरातील लक्ष्मी हि घरातील महिला असते. घरातील स्त्रीचा मानसन्मान करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा सन्मान करण्यासारखे आहे. आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितलेले आहे कि जेथे नारीची पूजा केली जाते तेथे भगवंतांचा वास असतो.

आणि म्हणून घरातील महिलेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून घरातील स्त्री कोणतेही काम करते त्या कार्याचा सकारात्मक व नकारात्मक असा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडत असतो.

एक सुखी परिवार तोच समजला जातो जिथे पती व पत्नी आपापसात हसत खेळत आपले जीवन व्यतीत करत असतात. अशा घरात निम्म्या पेक्षा जास्त अडचणी आपोआप नष्ट होतात.

घरातील स्त्री चरित्रवान असेल, कुटुंबाचे हित बघणारी असेल, गुणवती असेल, सासरचा कमी पणा बोलून न दाखवता जिथे कमी आहे तिथली बाजू सावरून घेत असेल तर अशा कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही.

सकाळची वेळ हि श्री भगवंतांची वेळ असते अशा वेळी सर्व देवी देवता पृथ्वीवर निवास करतात म्हणून अशा वेळी घरातील स्त्री ने घराची स्वच्छता केली व सकाळी सकाळी तुळशीला पाणी अर्पण केले आणि रविवारी सूर्य नारायणांना हळद मिश्रित पाणी अर्पण केले तर अशा घरात मान सन्मान , यश पैसा सर्व काही असते.

सोबतच अशा घरात राहणाऱ्या व्यक्ती नेहमी आनंदी व प्रसन्नचित्त असतात. अशा कुटुंबात कधीही धनाची कमतरता राहत नाही. कारण त्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत होतो. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी सूर्य ग्रहाचे मजबूत असते जरूरी असते.

रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घराची स्वछता करावी. उष्टे, खरकटे भांडी तसेच ठेवू नयेत. जर कामवाली बाई येणार असेल तर ती भांडी पाण्याने हिसळून गॅलरी मध्ये ठेवावी, किचनवरच पडू देऊ नयेत. ज्या घरात स्त्रिया हि कामे करतात त्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

ज्या घरातील आर्थिक व्यवहार स्त्रियांच्या हातात असतो त्यात घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण घरची स्त्री हि गृहलक्ष्मी असते. म्हणून एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीकडे खूप आनंदात राहते.

स्त्रियांकडे पैशाचा व्यवहार असेल तर त्या तो पैसा जपून वापरतात. वायफळ खर्च अजिबात करीत नाहीत. त्यांना पैशाचे महत्व कळते. म्हणून अशा घरात कधीची धनाची कमतरता राहात नाही.

ज्या घरात स्वछता असते तिथे लक्ष्मी असते. म्हणून स्त्रियांनी आपल्या घराच्या स्वछ्तेकडे विशेष लक्ष द्यावे. असे म्हणतात स्वछता दिसे तिथे लक्ष्मी वसे. म्हणून आपले घर आंगण नेहमी स्वच्छ ठेवावे.

ज्या घरातील स्त्रिया नेहमी हसतमुख असतात, ज्या घरातील महिला अतिथींचे हसून स्वागत करतात, घरातील स्त्री सर्वांशी मिळून मिसळून राहते अशा घरावर देव लक्ष्मी कधीही नाराज होत नाही. अशा घरावर देवी लक्ष्मीचा नेहमी वरदहस्त असतो.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here