नमस्कार मित्रांनो,
मुंबई- आग्रा महामार्गावरील नरडाणा ता. शिंदखेडा येथील जुन्या टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी महामार्गावर 40 वर्षीय विवाहित व तिच्याबरोबर असलेल्या नात्यांने दीर असलेला 31 वर्षीय तरूण हे दारु पिवून धिंगाणा घालत होते.
दोघांनी पोलिस उपनिरीक्षक, महिला व पुरुष पोलिस कर्मचारी यांच्या अंगावरील शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा व्हीडीओ क्लीप वायरल झाली. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत महिलेला तीच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले.
रस्त्यावर वाहन धारकांना देत होते त्रास
नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक मनोज ठाकरे यांना माहिती मिळाली की, जुन्या टोल नाक्याजवळ महामार्गावर विवाहित तरूणी व एक तरूण दारूच्या नशेत रस्त्याच्या मध्ये आडवे होवून वाहन धारकांना त्रास देत आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर नरडाणा येथील जुने टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शितलच्या पुढे अलका किशोर पाटील वय 40, रा. डोंगरे महाराजनगर धुळे. आणि हातनूर ता. शिंदखेडा महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील वय 31 हे दोघे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधळ घालत होते.
शिवीगाळ करत केली धक्काबुक्की
नरडाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद पाटील, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यावेळेस त्या महिलेसह पुरुषाने शिवीगाळ करीत रस्त्यावर धाव घेतली.
पोलिसांनी रोखले असता थेट त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले महिलेला पती किशोर पाटील यांच्या ताब्यात दिले.
दोघांविरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की करणे व सार्वजनिक जागी दारू पिऊन शांततेचा भंग करणे आदी कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरिक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.
पहा व्हिडीओ
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशाच अनेक घडामोडी रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.