देवपूजेत केलेल्या या चुकांमुळे पूजेचे फळ मिळत नाही. महिलांनी हे नियम अवश्य पाळावे.

0
127

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्य पुष्कळ दानधर्म, धार्मिक विधी, पूजा-अर्चा करूनही त्यांच्या समस्या त्यांच्या जीवनातून दूर होण्याचे नाव घेत नाहीत, असे अनेकदा लोक म्हणताना आपण पाहिले असेल. एवढी पूजा करूनही त्यांची इच्छा का पूर्ण होत नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच येतो.

देव अशा व्यक्तींची साधना का स्वीकारत नाही आणि त्यांनी केलेल्या पूजा पाठाचे योग्य फळ त्यांना का मिळत नाही, असाही विचार मनुष्य करतो. जेव्हा देव माणसाची पूजा, दान स्वीकारत नाही, तेव्हा त्यामागे अनेक कारणे असतात. उपासनेचे काही नियम देखील आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

जर तुमची इच्छा असेल की तुम्ही केलेल्या पूजेचे फळ तुम्हाला मिळावे, तर पूजा करताना नेहमी पिवळे किंवा पांढरे धुतलेले कपडे घालावेत. याशिवाय पूजेची वेळ आहे जसे की पहाटे 3 ते 4 ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. अशा वेळी केलेली पूजा कधीही व्यर्थ जात नाही.

मित्रानो बेडरूममध्ये देवघर कधीच असू नये आणि जरी असेल तर त्यामध्ये पार्टिशन असावे. देवघर हे आपल्या पेक्षा उंचावर असावे, उंचावर म्हणजे टांगलेले वगैरे नाही पण आपल्यापेक्षा थोडं उंचीवर असावे.

तुमच्या वास्तूमधील सर्वात पवित्र स्थान हे देवघर आहे, देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावे म्हणून आपण किती उपाय करत असतो. म्हणून जिथे तुमचं देवघर आहे ती जागा स्वच्छ केली पाहिजे. यामुळे अखंड लक्ष्मी घरात नांदेल, घरात सकारात्मकता नांदेल.

पाण्यात मीठ आणि गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ करा. देवाचे आसन, वस्त्र हे एकच असावे जे देवसाठीच वापरले पाहिजे. जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो तेव्हा आपल्या माथ्याला हळद, कुंकू लावले पाहिजे, सेवा करत असताना हातात बांगड्या या हव्यात.

महिलांच अस असत की जेव्हा टाइम मिळतो तेव्हा पूजा करतात, पण सकाळी लवकरात लवकर देवाची पूजा ही झाली पाहिजे. देवपूजा करत असताना सुरुवातीला दिवा लावायचा असतो.

कोणतीही सेवा करत असताना अग्नी देवाच्या साक्षीने ही सेवा आपण करायची असते म्हणून दिवा प्रजवलीत केला पाहिजे आणि दिवा ठेवत असताना त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात आणि त्या तांदळावर हळद कुंकू वहा व त्यावर दिवा ठेवा.

घरात सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा हा प्रजवलीत झालाच पाहिजे. दिवा प्रजवलीत केल्यानंतर देव स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांना हळद कुंकू लावायचे आहे.

श्रीयंत्र असेल तर रोज धुतले तरी चालतात पण मंगळवारी आणि शुक्रवारी ते श्रीयंत्र बाहेर काढा, स्वच्छ धुवा आणि त्यावर अक्षता टाका व धूप दीप ओवाळा.
दररोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, तुम्ही घरात जे काही खाता ते तुम्हाला देवाला दाखवला पाहिजे.

देव पूजा करत असताना रांगोळी काढली पाहिजे. घरात सकाळ, संध्याकाळ कापूर हा जाळलाच पाहिजे. संध्याकाळी तुळशी समोर शुद्ध गाईचा दिवा लावलाच पाहिजे.

देवपूजा केल्यावर अजिबात रागावू नका. यासोबतच इतरांवर टीका करणे टाळा. जर तुम्ही यापैकी कोणतेही काम केले तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ अजिबात मिळणार नाही.

घरात दक्षिणावर्ती शंख हा पाहिजेच. गप्पा मारत मारत पूजा करणे हे चुकीचे आहे. देवपूजा करत असताना नामस्मरण करा. यामुळे त्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. देवाला घालणारी फुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मगच ते देवाला वहा.

तुम्ही केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आठवड्यातून एकदा मौन व्रत करावे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची सहनशक्ती वृद्धिंगत होईल.

देवघरात तुटलेले फुटलेले देव कधीच नसावेत, जळलेली फोटो फ्रेम नसावी. हे सगळं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते, मनशांती मिळेल. वरील नियम जर पाळले नाहीत तर तुम्ही जी सेवा करता त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here