नमस्कार मित्रानो
मित्रानो चाणक्यनीती चाणक्य द्वारे रचलेला एक नीती ग्रन्थ आहे , ज्यात आयुष्य सुखमय आणि सफल बनवण्यासाठी उपयोगी सल्ले दिले आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय मानव समाजाला आयुष्याच्या प्रत्येक पैलूला व्यवहारिक ज्ञान देणे होय.
चाणक्य एक महान ज्ञानी होते. ज्यांनी आपल्या नीतीमुळे चंद्रगुप्त मौर्यांना राजगादीवर विराजमान केले होते. जाणून घ्या चाणक्य यांच्या काही नीती ज्या आपल्या जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वाटेवरती आपल्याला उपयोगी पडतील.
यातीलच एक विषय म्हणजे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा पाच गोष्टी ज्या महिला नेहमीच आपल्या पतीपासून लपवतात. या गोष्टी त्यांना आपल्या पतीला सांगणे त्यांना बरोबर वाटत नाही. आपल्या धर्मामध्ये विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक आहे.
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीला आपले सुख दुःख एकमेकांसोबत शेअर केले पाहिजे. असं केल्याने दोघांमधील प्रेम वाढते आणि नातं अजून जास्त मजबूत होते. परंतु फार पूर्वीपासून जस म्हटलं आहे, स्त्रियांना समजणे हे अत्यंत कठीण काम आहे.
‘स्त्री’ या ब्रह्मांडातील एक मात्र अशी रचना आहे जिला नाही कोणता देव, नाही कोणता महाज्ञानी ऋषी समजू शकले आहे. एखाद्या स्त्रीच्या मनात कधी कोणत्या वेळी काय चालू आहे याचा थांगपत्ता लागणे शक्य नसते.
एका स्त्रीच्या मनातील गोष्ट एक स्त्रीच समजू शकते. स्त्री आपल्या चरित्राच्या सामर्थ्याने घराला स्वर्ग बनवू शकते तर दुसरीकडे नर्क ही बनवू शकते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रीला पूजनीय मानले जाते. त्यांना महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. आचार्य चाणक्य नुसार, ज्या घरांमध्ये स्त्रियांचा अपमान होतो त्या घरून लक्ष्मी निघून जाते. त्या घरांमध्ये महिलांवर अत्याचार केले जातात मारपीट केली जाते त्या घरामध्ये कायम दरिद्री राहते. पुरुषांचे हे कर्तव्य आहे स्त्रीला उचित सन्मान द्यावा.
महिलांना युधिष्ठिर कडून शाप मिळाला होता की त्या आपल्या पोटामध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू शकत नाही, हे तुम्ही जाणता. म्हणून बऱ्याचदा महिला कधी ना कधी काही गोष्टी कोणाला न कोणाला सांगून बसतात आणि नंतर पस्तावतात.
परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या पतीपासून त्या लपवतात. याचं कारण दोघांमध्ये अंतर पडू नये, वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ नये हेच असते. चाणक्य नीति नुसार आपण आपली कमजोरी कधीही कुणाला सांगू नये.
जुनं प्रेम
लग्नाआधी प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कोणता ना कोणता पुरुष अवश्य येतो परंतु हे स्त्री चे कर्तव्य असते की तिने त्यासोबत शारीरिक संबंध बनवू नयेत. स्त्रिया याबद्दल आपल्या पतीला कधीही सांगत नाहीत. तिला पतिकडून प्रेम आणि सन्मान गमवण्याची भीती असते. चरित्रवान स्त्रियांसाठी सन्मानापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नसते.
मनातील इच्छा
बऱ्याचदा लग्नानंतर पती पत्नी मध्ये काही विषयांमध्ये मतभेद होतात. एकमत न झाल्यामुळे अनेकदा महिला माघार घेऊन पतीचे म्हणणे ऐकतात. मग यामध्ये मनापासून तिची इच्छा असेल किंवा नसेल. आपल्या मनातील इच्छा पती समोर प्रकट करत नाहीत.
आजार
जास्त करून महिला आपल्या आजाराबद्दल पतीला सांगत नाहीत. असं करण्यामागे त्यांचे कारणही असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्या पतीने त्रासुन जावे असे त्यांना वाटत नाही. ही पतीची जबाबदारी आहे त्यांनी आपल्या पत्नीची काळजी घेतली पाहिजे. कामाचा ताण तणाव राग घरी पत्नीवर काढू नये.
पैसे
हे सर्वजण जाणतात की महिला पैशांच्या बाबतीत समजदार असतात. पती पासून लपवून काही पैसे आपल्याजवळ ठेवतात. त्यातून घरातील छोट्या छोट्या लागणाऱ्या जरुरीच्या वस्तू विकत घेऊ शकेल हा हेतू असतो. या पैशातून त्या स्वतःसाठी नव्हे तर घरासाठीच बचत करत असतात.
मैत्रिणींना गोष्टी सांगतात
बऱ्याचदा अनेक महिला आपल्या मैत्रिणींना गोष्टी शेअर करत असतात. ज्या त्यांना केल्या नाही पाहिजे. चाणक्यनीती नुसार महिलांना आपल्या पतीच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत कोणालाही सांगितलं नाही पाहिजे. स्त्रिया आपल्या पतीच्या संदर्भात असलेले अनेक रहस्य , राज आपल्या मैत्रिणींना सांगतात. आणि ही गोष्ट त्या आपल्या पतीपासून लपवतात.
तर या होत्या त्या पाच गोष्टी ज्या महिला आपल्या पतीपासून लपवतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.