नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा तुम्हाला तिथे दिसेल कि बरेच जण नारळ फोडतात पण या नारळ फोडणाऱ्यांमध्ये सर्वच पुरुष असतात. स्त्रिया, महिला या चुकूनही नारळ फोडत नाहीत.
बऱ्याचदा आपण असेही पाहतो कि त्या मंदिराचे जे पंडित असतात ते नारळ फोडण्याचं काम करत असतात. मात्र स्त्रिया नारळ फोडताना तुम्हाला कधीच दिसणार नाहीत.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्री फळाचं विशेष असं महत्व आहे. तुम्ही कोणत्याही देवी देवतांची पूजा करा त्या पूजेमध्ये नारळ हा अवश्य असतोच. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
मित्रांनो असं मानलं जात कि नारळ चढवल्याने आपल्या जीवनातील पैशा संबंधीच्या समस्या दूर होतात. हिंदू धर्म शास्त्राने स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाहीये.
शास्त्रानुसार स्त्रियांनीं नारळ फोडणे अशुभ मानण्यात आले आहे. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य सुद्धा वाटेल आणि काही जणांना राग सुद्धा येईल.राग येन साहजिकच आहे. स्त्री वर्गाला या विषयी वंचित ठेवले त्याबद्दल राग असणे स्वाभाविक आहे.
मित्रांनो एक कथा या मागे खूप प्रचलित आहे कि जे ब्रम्ह ऋषी विश्वामित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली.
मात्र हे विश्व निर्माण करण्यापूर्वीच ब्रम्हऋषी विश्वामित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती आणि म्हणूनच नारळाला मानवच प्रतिरूप मानण्यात येत. नारळ हे बीजरूपी असल्यामुळे ते प्रजनन क्षमतेशी जुळलेलं आहे.
म्हणजेच आपली जी प्रजनन क्षमता असते अगदी त्याच्याशी या नारळाचा संबंध आहे. आणि आपल्याला माहित असेल कि स्त्रिया बीजरुपातच बाळाला जन्म देतात आणि म्हणून हिंदू धर्म शास्त्राने स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाहीये.
तर मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल कि हिंदू धर्मानुसार स्त्रियांना नारळ फोडण्यास मनाई का आहे. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.