स्कुल बसचा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या काय आहे यामागे खरे कारण…

0
246

नमस्कार मित्रांनो,

आपण बऱ्याचदा पाहिले असेल कि कोणत्याही स्कुल बस वर आपल्या शाळेचे नाव लिहिलेले असते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का कि सर्व स्कुल बसचा रंग पिवळाच का असतो?

प्रत्येक स्कूल बसचा रंग नेहमीच पिवळा ठेवला जातो आणि त्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. हि वैज्ञानिक करणे मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. चला तर मग जाऊन घेऊ काय आहे त्या मागे कारण.

मित्रांनो पिवळा हा रंग असा आहे जो दूरवरून सुद्धा लगेच दिसतो. आणि पिवळी स्कुल बस पाऊस, धुकं, ऊन यामध्ये सहज नजरेस पडते. ज्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.

उत्तर अमिरिकेत 19 व्या शतकात सर्वात आधी स्कुल बस वापरण्यास सुरवात केली. पण त्याकाळी अनेकांकडे मोटारगाडी नसल्याने शाळेत मुलांना ने आण करण्यासाठी घोडागाडीचा वापर केला जायचा.

20 व्या शतकाच्या सुरवातीला गाडी म्हणून घोडागाडीऐवजी मोटार गाड्यांचा वापर सुरु झाला. लाकूड आणि धांतूंपासून हि गाडी तयार केली जायची. तर केशरी किंवा पिवळा रंग या गाड्यांना दिलेला असायचा.

1930 मध्ये अमेरिकेत एक संशोधन केले गेले ज्यामध्ये हे स्पष्ट झाले कि पिवळा रंग पटकन आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतो. यामागे कारण असे कि पिवळा रंग बाकी रंगांपेक्षा 1.24 पट जास्त आकर्षित करतो. जे मानवी डोळ्यांना प्रथम आकर्षित करतात.

पिवळ्या रंगाची स्कुल बस दुरून दिसल्या नंतर समोरील वाहन चालक अधिक सतर्क होऊन वाहन चालवतात. परिणामी होणाऱ्या अपघाताची संभावना टाळली जाऊ शकते. या सर्व कारणांसाठी स्कुल बसचा रंग पिवळा ठरवण्यात आला.

पिवळा रंग हा असा रंग आहे जो प्रखर प्रकाशामध्ये आणि मंद प्रकाशामध्ये सहज उठून दिसतो आणि नजरेस येतो. बऱ्याच स्कूलच्या बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पहाटे लवकर निघतात. ज्यावेळेस मंद प्रकाश असतो. अशा वेळेस हा रंग सहज उठून दिसतो.

स्कुल बस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अनेक नियम जारी केले आहेत. त्यानुसार खाजगी स्कुल बसचा रंग पिवळाच असावा. सोबतच बसच्या पुढे आणि मागे स्कुल बस असे स्पष्ट पणे नमूद केलेले असावे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसला पिवळा रंग दिला जातो. मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला समजले असेल स्कुल बसचा रंग पिवळा का असतो.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

वरील माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here