नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की जैन आणि मारवाडी बांधव कांदा, लसूण का खात नाहीत.
जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी लसूण आणि कांदा खूपच मोलाची भूमिका बजावतात. या दोन्ही मुळे जेवणाला एक वेगळीच चव येते आणि जेवण अजूनच चटकदार बनते.
आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की कांदा लसूण खाऊ नये. मित्रांनो सात्विक भोजन म्हणजेच लसूण आणि कांदा नसलेले पदार्थ. जैन आणि मारवाडी समाजात मुख्यतः सात्विक भोजन म्हणजेच कांदा आणि लसूण नसलेले जेवण बनवलं जातं.
सात्विक भोजन केल्याने तम गुण नाहीसे होतात असं म्हटलं जातं. मित्रांनो असा समज आहे की कांदा लसूण हे तामसिक पदार्थ असल्यामुळे प्रकृती वर त्याचा दुष्परिणाम होत असतो.
तामसिक भोजन म्हणजे नेमकं काय. कांदा आणि लसूण याचा त्याच्याशी काय संबंध.
मित्रांनो असं म्हटलं जातं की आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. आपण जे खातो तसेच आपले विचार बनतात.
चला तर जाणून घेऊयात कांदा आणि लसूण खाण्या मागे कोणते सामाजिक आणि पौराणिक विचार जाणून घेऊयात.
आयुर्वेदा नुसार जेवणाचे 3 प्रकार असतात. सात्विक, राजसीक आणि तामसिक.
यामध्ये सात्विक भोजनामध्ये मनाची पवित्रता होऊन शांती आणि संयम हे गुण वाढतात. राजसीक भोजन केल्याने काम करण्याची इच्छा वाढते आणि स्वभाव आनंदी होतो. तर तामसिक भोजन केल्याने अहंकार वाढतो. मन अशांत होते, लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होते.
दूध, तूप, गव्हाचे पीठ, कारले, पडवळ, मूग, मेथी हे पदार्थ सात्विक गुण वाढवतात.
तसेच तिखट, चटपटीत पदार्थ, गोड पदार्थ आपल्यात असलेले राजसीक गुण वाढवतात.
कांदा, लसूण, मांस, मासे आणि अंड्याचे पदार्थ तम गुण वाढवतात.
मित्रांनो लसूण आणि कांद्याशी निगडित एक पौराणिक कथा सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की, जेव्हा समुद्र मंथनातुन निघालेले अमृत मोहिनी रूप धारण करून देवी देवतांना वाटप करत होते, तेव्हा तिथे दोन रा क्षस सुद्धा येऊन बसले.
त्या दोन राक्ष सांचे नाव होते राहू आणि केतू. त्यांच्या हाती सुद्धा अमृताचे काही थेंब लागले.
पण जेव्हा भगवान विष्णूंना या राक्ष सांच्या कटाबद्दल समजले, तेव्हा भगवान विष्णू यांनी त्या दोन्ही राक्ष सांचे धडशि रा वेगळे केले. त्यावेळी त्यांच्या हातात असलेले अमृताचे थेंब जमिनीवर पडले.
या जमिनीवर पडलेल्या अमृतातून कांदा आणि लसूण यांचा जन्म झाला. मित्रांनो अमृता पासून तयार झालेले असल्यामुळे रो गांशी लढण्यासाठी आवश्यक सर्व गुण यामध्ये आहेत.
पण रा क्षस मुखातून बाहेर पडल्यामुळे त्यातून अत्यंत उग्र वास यायचा. त्यामुळे त्याला अपवित्र समजले जाते.
मित्रांनो ही तर झाली पौराणिक कथा. आता जाणून घेऊया शास्त्रीय कारण.
कांदा आणि लसूण हे दोन्ही पदार्थ उष्णता वर्धक समजले जातात. हे दोन्ही पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे या पदार्थाना तामसिक भोजन श्रेणी मध्ये गणले जाते.
मित्रांनो या पदार्थांचे सेवन केल्याने कामवा सना देखील प्रचंड वाढते. त्यामुळे मनुष्यामध्ये अपप्रवृत्तीचा संचार होण्याची शक्यता असते. यामुळे मनुष्य अध्यात्म, चिंतन यांपासून दूर जातो. त्याचा स्वभाव रागीट बनतो.
तुम्हाला समजलं असेलच की कांदा लसूण खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात. आपण जे खातो, पितो त्याचा आपल्या मनाशी कसा संबंध असतो.
मित्रांनो याच कारणामुळे जैन आणि मारवाडी बांधव कांदा आणि लसूण खात नाहीत.
अनेकांसाठी हा श्रद्धेचा तर अनेकजण याला अंध श्रद्धा मानतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.