नमस्कार मित्रांनो,
आजकाल स्त्रिया सुद्धा पुरुषांप्रमाणे शर्ट, पॅन्ट, ट्राऊजर घालणे पसंद करतात. महिलांच्या आणि पुरुषांच्या शर्टच्या डिझाईन मध्ये फरक हा असतोच. तुम्ही कधी नोटीस केले आहे का, कि महिलांच्या शर्टला खिसा का नसतो ते? मित्रांनो बऱ्याच महिलांची हि तक्रार असायची कि आमच्या शर्टला खिसा का नाहीये? साडीला खिसा नाही हे ठीक आहे पण आमच्या शर्टला खिसा का नाही? असं फक्त स्त्रियांच्याच बाबतीत का?
मित्रांनो या सर्वांची सुरवात झाली युरोप मधून. त्या काळी युरोपियन लोकांच्या स्त्री असो वा पुरुष कोणाच्याच शर्टला खिसा नसायचा. पुढे जाऊन 1600 च्या दरम्यान पुरुषांच्या कपड्यांना आतल्या बाजूने खिसा बनवण्याची फॅशन आली. पुढे जाऊन हि फॅशन खूपच लोकप्रिय झाली. महिलांना खिशाचा लाभ भेटला पण तो 17 व्या शतकात. त्या वेळी युरोप मध्ये हूप स्कर्ट नावाची फॅशन आली होती. हूप स्कर्ट म्हणजे झग्याप्रमाणे दिसणारा ड्रेस.
त्या काळी या ड्रेस मध्ये आतल्या बाजूस एक लहान पाऊच किंवा छोटासा कप्पा बनवला गेला. महिलांच्या ड्रेसच्या आत कप्पा हि फॅशन थोडी विचित्रच होती. पण हळू हळू हीच फॅशन युरोप मधील महिलांची ओळख झाली होती.पुढे जाऊन बारीक आणि स्लिम ट्रिम कपड्यांची फॅशन आली. आणि त्यात आता खिसा लावणे म्हणजे मूर्खपणाचे वाटू लागले होते.
कारण फिटिंग कपड्यात जर खिसा दिला तर साहजिकच त्यात महिला काहींना काही वस्तू ठेवणार व ते दिसायला खूपच विचित्र वाटणार. खिसा दिला आणि त्यात जर महिलांनी काही वस्तू ठेवल्या तर त्यांच्या सुंदरतेशी छेडछाड होईल असे वाटू लागले.आणि याचाच विचार करून खिसे फक्त पुरुषांसाठी मर्यादित राहिले. याच कारणाने लेडीज शर्टला खिसा नसतो.
त्या काळी महिलांना सुंदरतेची खाण म्हणून ओळखले जात असे. जेव्हा महिलांनी खिश्याची मागणी केली तेव्हा त्यांना विरोध केला गेला. परंतु आता काळ बदलला आहे. कायदे बदलले आहेत. आता महिला त्यांच्या मर्जीच्या मालकीण आहेत. आता महिला त्यांना आवडेल तो ड्रेस, कपडे घालून मनसोक्त फिरतात. आता शर्टला पॉकेट ठेवायचे कि नाही हे त्यांच्या मर्जीवर अवलंबून असते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा. अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.