रात्रीच्या वेळी का रडतात कुत्रे… सत्य जाणून तुम्हाला धक्काच बसेल…

0
391

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो कुत्र्यांबाबत काही गैरसमज सांगितले जातात की, जेव्हा घरासमोर एखादा कुत्रा रडला की काहीतरी घरात अशुभ होण्याची शक्यता असते. पण आपण अशा अंध श्रद्धेचे मुळीच समर्थन केले नाही पाहिजे. पण, समाजात काही गोष्टींबाबत उगाच समज प्रचलित असतात.

मित्रांनो काही लोक तर, काही घटनांचा संदर्भ संकेताशी जोडतात आणि भविष्यवाणी करतात. त्याचा वास्तविकतेशी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास काहीही संबंध नसतो.

कुत्रा हा पाळीव प्राणी आपल्या मालकाशी खूप प्रामाणिक असतो. घराचे इमानदारीने संरक्षण करतो. त्यामुळे काही लोक हे कुत्रे पाळत असल्याचे दिसून येते. याशिवाय कुत्र्याच्या वफादारीमुळेच बरेच लोक कुत्र्यांना आपल्या घरात किंवा शेतामध्ये ठेवत असतात.

असे म्हणतात की, कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो, त्यामुळे त्यांना चांगले-वाईट यातील फरक समजत असतो. असे सांगितले जाते की, कुत्र्यांच्या रडल्याने अपशकुन होत असतो, पण हे चुकीचे आहे. आपल्या घरातील वृद्ध लोक सांगत असतात की, जेव्हा रात्री कुत्रे रडतात, तेव्हा आपल्या परिवारातील कोणाचा तरी मृ त्यू होण्याचे ते संकेत मानले जाते.

मित्रांनो काही लोक सांगतात की, कुत्र्यांना प्रे त किंवा भु ते दिसल्यामुळे त्याना आजूबाजूच्या संकटांची जाणीव झाल्यास, ते कुत्रे रात्री अचानक रडायला सुरवात करतात. परंतु वैज्ञानिक दृष्टीने हे सर्व चुकीचे सांगितले आहे. त्यांनी अनेक वर्षे या कुत्र्यांवर अनेक रिसर्च करून पाहिले, त्यामध्ये त्यांना काही आश्चर्यकारक रित्या काही गोष्टी समजल्या. यामध्ये कुत्र्याच्या रडण्याला वैज्ञानिक भाषेमध्ये ओ व्ह ल म्हणतात.

वैज्ञानिक असे म्हणतात की, कुत्रा ही लांडग्यांची एक जात असल्यामुळे, ते रात्रीच्या वेळी हे कुत्रे लांडग्यांप्रमाणे अशा रडण्याच्या आवाजात एकमेकांशी संपर्क साधत असताना दिसतात. यालाच ओ व्ह ल म्हणतात.

असे म्हणतात की, कुत्रे ज्या भागांत राहतात त्यात ते आपला भाग किंवा अधिकार क्षेत्र समजत असतात. अशा वेळी त्या भागात कोणी दुसरे कुत्रे आल्यास त्याचा हा असा संकेत देऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतात. याशिवाय आपल्या भागांतील इतर कुत्र्यांनाही आपल्या भागांत नवीन कुत्र्या संबंधित सावध करण्याचे काम करतात. त्यामुळे इतर कुत्रे सावध आणि खबरदार होतात.

मित्रांनो या रडण्याच्या भाषेमधून ही कुत्री आपल्या दुसऱ्या कुत्र्याशी संवाद साधत असतात. तसेच यांची एकमेकांना समजून घेण्याची ही भाषा असल्याचे सांगितले जाते. यासह कुत्रा हा आपला रा ग किंवा विरोध दर्शवण्यासाठी ही कधीकधी रडत किंवा ओरडत असल्याचे सांगितले आहे.

जर आपल्या गल्लीत किंवा मोहल्ल्यात कोणी अनोळखी माणूस आल्यास तो कुत्रा आपल्या साथीदारांना त्या बाहेरील माणसावर नजर ठेवण्यासाठी एक प्रकारे संकेत देत असतो किंवा ओरडत असतो. तसेच आपल्या माणसांनाही या गोष्टी पासून सावध करायचे काम करत असतो. कारण कुत्र्याच्या दृष्टीने, त्या अनोळखी व्यक्तीमुळे आपल्या गल्लीतील माणसांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, कारण ते आपल्याला रोज पोळी-भाकरी टाकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाइक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच माहिती पूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here