साप्ताहिक प्रेम राशीभविष्य… 11 ते 17 जुलै 2021 : या राशी प्रेमात न्हाऊन निघतील तर या राशींच्या पदरी निराशाच पडेल…

0
261

नमस्कार मित्रानो,

मित्रानो शुक्र ग्रह हा प्रेमाचा कारक मानला जातो. सध्या शुक्र कर्क राशीत विराजमान आहे. सोबतच मंगळ देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे. आठवड्याच्या शेवटी सूर्य देखील कर्क राशीत विराजमान होतील. ग्रहांच्या या राशीपरिवर्तना मुळे काही राशींत प्रेमाचा पाऊस होण्यास सुरवात होणार आहे. तर काही राशींच्या जीवनात प्रेमाचे ढग येतील पण पाऊस पडण्याची वाट बघावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या राशीसाठी कसा असेल प्रेमाचा आठवडा.

मेष रास : या आठवड्यात प्रेम संबंध अधिक घट्ट बनतील. त्यामुळे मन अगदी प्रसन्न राहील. आवडीच्या व्यक्तींसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर खुश राहतील. दुनियेची पर्वा न करता आपण आपल्या लव्ह लाईफ मध्ये मग्न रहाल.

वृषभ रास : तुमचे प्रेम संबंध मजबूत बनतील. पा र्ट नर सोबत आनंदी वेळ घालवाल. जोडीदारासोबत कुठेतरी छोट्या सहलीला जाऊ शकता त्याने नात्यात अजून मधुरता निर्माण होईल. तुमच्या प्रेम संबंधांना आई वडिलांची साथ लाभेल.

मिथुन राशी : प्रेम संबंधांतील जुन्या आठवणी ताज्या होतील. वर्तमानात जगायचं ठरवलं तरी भूतकाळ मागे खेचू पाहिल. मन मारून जगत असाल तरी काळजी करू नका आठवड्याच्या शेवटी शेवटी सर्व काही सुरळीत होईल.

कर्क रास : प्रेमजीवन अगदी फुलून येईल. तुमचे प्रेम तुमच्या सोबत असल्यामुळे जीवन जगण्यात एक वेगळी हुरूप निर्माण होईल. आपल्या जोडीदारासोबत सुंदर वेळ घालवाल. दोघांनी सोबत घालवलेले क्षण फुलून येतील पण आठवड्याच्या शेवटी एखादी गोष्ट काळजावर वार करू शकते.

सिंह रास : प्रेमात परस्पर चर्चा करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा असे न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आठवडा ठीक राहील पण शेवटी मन अस्वस्थ राहील. तुमच्या धारदार बोलण्याने एखाद्याचे मन दुखावू शकते त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा.

कन्या रास : प्रेम संबंधांतील अनुभव अगदी क्षितिजापार नेणारे ठरतील. त्यामळे मन अगदी प्रसन्न राहील. प्रेमाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीची मदत देखील मिळू शकते. जोडीदाराच्या भावना समजून घ्यायचा प्रयन्त करा. त्यांच्या मनात काय आहे ते मनमोकळेपणे तुमच्या समोर मांडायचा चा न्स द्या. नाते अजून फुलून येईल.

तूळ रास : प्रेम संबंधांत तणा वाचे वातावरण राहील. बाहेरील व्यक्तीने तुमच्या नात्यात हस्तक्षेप केल्यास नाते संबंध बिघडू शकतात. आठवडाभर शांतता नसेल पण आठवडा अखेरीस शांतात लाभेल. जोडीदाराला वेळ द्या त्यामुळे नात्यात अजून प्रेम वाढेल.

वृश्चिक रास : प्रेमात परिस्थिती थोडी फार किचकट राहील. जे आपले हक्काचे आहे ते आपल्याला का मिळत नाही असे बरेच प्रश्न मनात घर करतील. हा आठवडा असाच निघून जाईल. संयम ठेवा. विचार करून निर्णय घेतल्यास नुकसान होणार नाही.

धनु रास : हा आठवडा प्रेमासाठी उत्तम काळ ठरू शकतो. मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. त्यामुळे मन अगदी प्रसन्न आणि आनंदी बनेल. आपल्या जोडीदाराला मत व्यक्त करुद्या. काही गोष्टी मनात ठेवल्याने नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

मकर रास : सर्व सुरळीत चालू असताना अचानक प्रेम संबंधांत तणावाचे वातावरण निर्माण होईल. तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. आठवड्याच्या शेवटी बिनसलेल्या गोष्टी पूर्ववत होतील. प्रेम संबंध अधिक घट्ट होण्याच्या अनेक संधी मिळतील.

कुंभ रास : चिडचिड करून बोलू नका. प्रेमाने बोलून समस्या सोडवल्या तर प्रत्येक समस्या नुकसान न करता निघून जाईल. अन्यथा नुकसान निश्चित. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती नियंत्रणात येईल सोबतच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल.

मीन रास : प्रेमाच्या बाबतीत परिस्थिती थोडी किचकट असली तरी तुमच्या वाणीद्वारे त्यावर विजय प्राप्त कराल. आठवड्याच्या शेवटी एखादी बातमी ऐकून त्रास होऊ शकतो. चिडचिड न करता शांतपणे राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयन्त करा.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here