नमस्कार मित्रानो,
मित्रानो आजकाल तुम्ही पाहत असाल कि सर्वच जण मॉडर्न आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व काही आपल्याला एकदम लॅव्हीश पद्धतीत हवं असत. त्यामुळे आपण नकळत वास्तुशास्त्रात सांगितलेल्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. परिणामी याच करणारे अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड दयावे लागते.
अशा वेळी अनेक उपाय करून देखील आजार काही पिछा सोडत नाहीत. वारंवार कोणी ना कोणी घरातील व्यक्ती आजारी पडत राहतो. विशेषतः घरातील स्त्रियांवर यांचा जास्त वाईट परिणाम दिसून येतो. मित्रानो फक्त आजारपणाच नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे काम देखील हे वास्तुदोष करत असतात.
मित्रानो रात्री झोपताना जर तुम्ही दक्षिण दिशेला डोके करून झोपत असाल तर घरातील स्त्रीला वारंवार आजारी पडण्याचा सामना करावा लागतो. या दिशेला डोकं करून झोपणाऱ्या महिला दिवसभर फ्रेश नसतात. नेहमीच त्यांच्या अंगी सुस्ती भरलेली असते. नकारात्मक ऊर्जेचा संचार त्यांच्या अंगी होत असतो.
वारंवार सुस्ती वाटत असेल तर घराच्या पूर्व दिशेला जाऊन सूर्याकडे तोंड करून बसावे. असे केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारत्मक ऊर्जेचा संचार आपल्या अंगी होईल. आणि लक्षात ठेवा दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपू नये.
मित्रानो घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला टॉयलेट किंवा बाथरूम नसावे. असे असल्यास घरात कायम नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. परिणामी घरातील कोणी ना कोणी सतत आजारी पडू शकते. त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेत असाल किंवा बनवत असाल तर या दिशेला टॉयलेट किंवा बाथरूम बांधू नका.
मित्रानो घराच्या अगदी मधोमध जड वस्तू ठेवू नका. शक्यतो घरातील मधली जागा रिकामीच असावी. आणि जर तुम्हाला आवश्यकता असल्यास तिथे टीपॉय किंवा एखादा सपाट टेबल ठेवू शकता ज्यावर तुम्ही काही शोची झाडे किंवा फुलदाणी ठेवू शकता. असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि पॉसिटीव्ह ऊर्जा घरात खेळती राहू शकते.
मित्रानो तुम्हाला हे कदाचित माहित नसेल पण घरातील भिंतींचा रंग देखील महिलांच्या स्वास्थ्याशी संबंधित असतो. घराला दिलेला रंग जर जास्त गडद असेल तर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. घराला जो रंग द्याल तो अगदी सॉफ्ट असावा. अजिबात डार्क नसावा. रात्री झोपताना पूर्ण काळोख करून झोपु नये. घरात मंद प्रकाश हा हवाच.
मित्रानो घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा असू नये. जर असेल तर घरातील स्त्री वारंवार आजारी पडू शकते. त्या स्त्रीच्या अंगी नकारात्मकता संचार करू शकते. घरातील स्त्री सारखी चिडचिड करू शकते. म्हणून वास्तू शास्त्रानुसार घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा करू नये.
मित्रानो वर जे पाच वास्तू दोष सांगितले त्यात तुम्ही सहज बदल करू शकता. हे बदल तुम्ही नक्कीच करून घ्या. तुमच्या घरात आनंद आणि भरभराट नक्की होईल.
मित्रानो गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण त्या योग्य नियमांत नसतील तर त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तर मित्रानो हे बद्दल नक्की करा. तुमच्या घरात पैसा सदैव खेळता राहील आणि घराची भरभराट होईल.
वरील माहिती हि वास्तू शास्त्रावर आधारित असून कोणत्याहि प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही वास्तू तज्ज्ञांचासल्ला घेऊ शकता.