नमस्कार मित्रांनो,
वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ असून वृश्चिक राशीचे लोक हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी मानले जातात. हे लोक रहस्यमयी स्वभावाचे अतिशय ज्ञानी आणि भावनिक मनाचे असतात.
हे लोक फारच इमानदार असून कल्पनाशील वृत्तीचे असतात. सत्य बोलणारे लोक यांना फार आवडतात. हे स्वतः देखील नेहमी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतात. हे जरी भावनिक स्वभावाचे असले तरी मनाविरुद्ध जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा हे क्रोधीत होतात.
हे जेवढे जास्त भावनिक असतात तेवढेच ते क्रोधीत सुद्धा होतात. वृश्चिक राशीच्या लोकांना समजून घेणे वाटते तेवढे सोप्पे नसते. हे अतिशय चांगले मित्र असतात. एक व्यक्ती म्हणून समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात.
हे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असून यांच्या डोळ्यांत मोहिनी असते. या लोकांना सौंदर्याची आवड असते पण आयुष्यात यांना हवे तसे प्रेम मिळत नाही. खऱ्या प्रेमासाठी जीवनभर आसुसलेले असतात.
यांच्या मनात फार जबरदस्त शारीरिक आकर्षण असते. स्वतःच्या शब्दाने अनेकांच्या हृदयाला पाझर फोडू शकतात. असे जरी असले तरी यांना यांच्या जीवनात सुरवातीच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
ईश्वर जणू यांची परीक्षाच घेत असतो. अनेक दुःख यातना अपमान आणि अपयश पचवल्यानंतर यांच्या जीवनात अचानक प्रगतीला सुरवात होते आणि पाहता पाहता हे यशाच्या शिखरावर विराजमान होतात.
आपल्या कर्तृत्वाने सर्वांना आश्चर्यचकित करून सोडतात. मार्च महिन्यापासून असाच काहीसा शुभ काळ वृश्चिक राशीच्या जीवनात येणार असून यांच्या आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडण्याचे संकेत आहेत.
ज्यांचे वय तीस वर्षाच्या वर आहे अशा लोकांच्या जीवनात आता खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरवात होणार आहे. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. जे काम हातात घ्याल ते काम यशस्वी करून दाखवणार आहात.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक अडचणीवर मात करणार आहात. आपल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार असून आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार आहे .
ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. योजलेल्या योजना सफल बनणार आहेत. स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांचा योग्य वापर करून खूप मोठे यश पदरी पडून घेण्यात यशस्वी ठरणार आहात.
तरुण तरुणींच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे त्यामुळे मन प्रसन्न बनेल. जीवन जगण्याविषयी गोडी निर्माण होणार असून जगण्यात रस निर्माण होणार आहे.
परिवारासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करून दाखवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. या काळात वाईट कर्म आणि व्यसनांनपासून दूर राहणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
स्वार्थी मित्रांपासून सावध राहणे गरजेचे आहे. नात्यातील लोक आपल्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात. या काळात कार्यक्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
आपले म्हणणे खरे जरी असले तरी ते समोरच्या व्यक्तीला पटेलच असे नाही. कदाचित यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते. हा काळ आपल्या यश प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय शुभफलदायी ठरणार आहे.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.
अशाच राशींविषयी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.