ओठात एक आणि पोटात एक..वृश्चिक राशी 14,15,16 जानेवारी खूप मोठ रहस्य उलगडणार, ज्याला आपलं समजत होता तेच दुःख देणार

0
177

नमस्कार मित्रांनो

मित्रानो वृश्चिक राशीवाल्यांना आता सावधान व्हायची वेळ आली आहे. येत्या १४-१५-१६ जानेवारीला ओठात एक आणि पोटात एक अशा काही लोकांशी तुमचा सामना होईल, जे तुम्हाला कमी लेखण्याचा प्रत्येक यशस्वी प्रयत्न करतील. परंतु ही माहिती तुम्ही पूर्ण नीट वाचल्यास आपण स्वतःचा बचाव करू शकाल.

एका मोठ्या रहस्यावरून पडदा हटेल. या तीन दिवसाचं पंचांग बघितल्यास द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी असून रोहिणी नक्षत्र आहे आणि या वर्षातील सर्वात मोठे आणि पहिले राशी प्रवर्तन होणार आहे. सूर्य आता धनु राशीला सोडून मकर राशीत प्रवेश करतील आणि मकर संक्रांतिचा उत्सव साजरा होईल.

याचा प्रभाव तुमच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक दृष्टी, प्रेम संबंध खास करून बेरोजगार असलेल्यांसाठी काय शुभ आणि अशुभ घटना होऊ शकतात याची विस्तृत भविष्यवाणी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे तुमच्या समोर तुमची स्तुती करतात परंतु पाठीमागे तुमच्या विरोधात बोलतात. अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. चुकीच्या संगतीत राहू नका. संगतीचा परिणाम तुमच्यावर देखील होतो तेव्हा चांगल्या मित्रांची संगत करा.

यशप्राप्ती नंतर गर्व होऊ देऊ नका. यासंबंधीचा अनुभव तुम्हाला वर दिलेल्या तारखाना येईल. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे, तुम्ही अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहाल, त्यामुळे तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. आपल्यापेक्षा दुसऱ्यांच्या कामाकडे तुम्ही अग्रेसर राहाल.

परंतु तुम्हाला असे करायचे नाही आहे. दुसऱ्यांची मदत तेवढीच करा ज्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होणार नाही. विद्यार्थी वर्गाला आपल्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मित्रांची आणि गुरुजनांची साथ लाभेल.

प्रकृतीमध्ये थोडी चिंताजनक बाब राहील. बाहेरच्या खाण्यामुळे पोट बिघडू शकते. तेव्हा यापासून दूर रहा. तुम्ही दीर्घकाळापासून व्यापार संबंधीत अडचणींचा सामना करत असाल तर सूर्याच्या या मोठ्या ग्रह परिवर्तनामुळे तुम्हाला या संकटापासून मुक्ती मिळणार आहे.

तुमच्या मुलांची प्रगती होईल. मुलांवर गर्व कराल अशी आनंदाची बातमी मिळेल. परंतु सावध रहा, तुम्ही जर कोणत्या पार्टीत जाणार असाल तर आपल्या वाणीवर ताबा ठेवा. अति बोलण्यामुळे तुम्ही संकटात सापडून अडचणीत याल, त्यामुळे तुमचा अपमान देखील होऊ शकतो.

भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला भविष्यात प्रगती देईल. मित्र परिवारासोबत कुठे पिकनिकला जायचा प्लान करत असाल तर तो काही काळासाठी थांबवा. भावनेच्या आहारी जाऊन कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेऊ नका.

तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊन तुमचा शत्रू भर समारंभात तुमचा अपमान करू शकतो. समस्यांपासून पळ काढणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देणे होय. वेळोवेळी आलेल्या संकटांचा सामना करावाच लागतो. हेच जीवनाचं सार आहे.

जर तुमच्या आई सोबत तुमचे काही बिनसले असेल तर तुम्हाला झुकते घ्यावे लागेल. आई सोबत वाद घालू नका तिचा आशीर्वाद घ्या, हे लक्षात ठेवा. नवीन व्यापार/ उद्योग सुरू करण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला अवश्य घ्या.

जर कोणी व्यक्ती गरजे पेक्षा तुमची जास्त स्तुती करत असेल तर त्यापासून सावधान रहा. भावा बहिणी मधले नातं घट्ट होईल. निर्णय घेताना कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका कारण चुकीचा सल्ला मिळण्याची शक्यता आहे. उधारी वसूल होईल.

काही उपाय :

मकरसंक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या लोट्याने सूर्याला अर्घ्य द्या. यात जल, काळे तीळ, लाल रंगाचे फूल आणि कुंकू असावे. उपाय केल्याने मकर संक्रांती पासून पुढे सुर्यदेवांची तुमच्यावर विशेष कृपा राहील. तुमची सर्व कामे मार्गी लागतील.

दीर्घकाळापासून मनातील सुप्त इच्छा पूर्ण करायची असल्यास, मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याचा शिक्का वाहत्या पाण्यामध्ये सोडा. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पाण्यात घालून स्नान केल्यास वाईट नजरेपासून बचाव होतो, असे शास्त्र सांगते. महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. शुभं भवतु…!!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here