वृश्चिक रास : तुमची जोडी कुठल्या राशी सोबत चांगली जमते ?

0
63

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो लग्नामध्ये कुंडलीचे मिलन यासाठी केले जाते की, प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या राशीचा प्रभाव असतो आणि प्रत्येक राशी स्वतःमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन्ही गुण ठेवते. दोन्ही व्यक्तीचे हे गुण बॅलन्स होऊन जावेत म्हणून कुंडली मिलन जरुरी असते.

आज आपण माहिती घेणार आहोत वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनाबद्दल. वृश्चिक राशी हि एक रहस्यमय राशी आहे. या राशीचे लोक चंचल मनाचे आणि एनर्जीने भरपूर असतात. हे लोक खुप महत्वकांक्षी आणि मेहनती असतात. वृश्चिक राशीचे लोक. कितीही थकलेले असले तरी जे ठरवतात ते पूर्ण करतातच.

वृश्चिक रास ही जल तत्वाची रास आहे. त्यामुळे एखादी छोटीशी गोष्ट पण त्यांना बानाप्रमाणे टोचते आणि यांचा कोणी अपमान केला तर हे जीवनभर त्याला माफ करत नाहीत.

ही एक त्यांच्या बद्दल नकारात्मक गोष्ट आहे. यांच्या मनात एवढे प्रेम असते कि तुम्ही जर त्यांच्या नुसार वागलात तर तुमच्यावर जीव ओळवळून टाकतील. प्रत्येक नात्यामध्ये या राशीचे लोक लॉयल असतात.

मेष रास : वृश्चिक राशीच्या जीवनसाथीबद्दल बोलायचे झाले तर , जर समोरची व्यक्ती मेष राशीची असेल तर त्यांचे अजिबात पटत नाही. कारण वृश्चिक रास ही जल तत्वाची रास आहे आणि मेष रास ही अग्नी तत्वाची रास आहे. म्हणून या दोघांचे नाते जास्त मधुर बनत नाही.

वृषभ रास : वृश्चिक राशीचे वृषभ राशीसोबत संबंध चांगले बनतात कारण वृश्चिक रास ही वृषभ राशीला आकर्षित करते. वृश्चिक चा मेहनती स्वभाव व वृषभ चा शांत स्वभाव एक कामयाब जोडी बनवते.

मिथुन रास : मिथुन रास बुद्धिमत्ता दर्शवते, हे लोक चलाख डोक्याचे व गंभीर व्यवहाराचे लोक असतात. जे वृश्चिक राशीवर हर तऱ्हेने समर्पित होतात. त्यामुळे हे एक बेहतरीन जोडीदार बनतात. कारण दोघेही एक सारखे विचार ठेवतात.

कर्क रास : कर्क राशीचे लोक खूप भावुक असतात आणि कोणताही निर्णय लगेच घेत नाहीत. तर वृश्चिक राशीचे व्यक्ती लगेच निर्णय घेणारे असतात. त्यामुळे कर्क राशी वृश्चिक राशीच्या अधीन राहतात. त्यामुळे या दोन्ही राशी मिळून उत्तम जोडी बनतात.

सिंह रास : सिंह रास आणि वृश्चिक राशी वाल्यांचे अजिबात पटत नाही कारण दोघेही शत्रूतेचा भाव ठेवतात. वृश्चिक रास ही बदला घेण्याचा भाव ठेवतात म्हणून दोघेही शत्रू भाव आहेत म्हणून यांची जोडी कधीच जमत नाही.

कन्या रास : कन्या राशीचे लोक हे खूपच चांगल्या विचाराचे असतात त्याच बरोबर थोडे लापरवाही करणारे असतात ज्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना यांचा क्रोध येतो. जर कन्या राशीच्या लापरवाही सोडुन दिली तर ही एक मजबूत जोडी बनू शकते.

तूळ रास : तूळ राशीचे लोक सौंदर्यवान आणि नीटनेटके असतात. हेच गुण वृश्चिक राशीमध्येही असतात. हे दोघेही प्रशंसक असतात आणि ही एक कामयाब जोडी बनते.

वृश्चिक रास : जर दोन्ही सुद्धा वृश्चिक राशीचे असतील तर यांचे नाते ठीकठाक असते, दोघांमध्ये मतभेद असतात कारण दोघेही इंडिपेंडंट विचाराचे असतात. प्रेम तर असतेच पण जर गोष्ट बिघडली तर एकमेकांना कमी दाखवण्यात आणि षडयंत्र रचण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत.

धनु रास : ही परस्पर विरोधी रास आहे, धनु राशीचे लोक अहंकारी असतात त्यामुळे वृश्चिक राशी सोबत यांचे जास्त पटत नाही.

मकर रास : मकर राशीचे लोक सर्वात इमानदार आणि विश्वासू असतात. दोन्हीही वृश्चिक आणि मकर एकमेकांना समर्पित असतात हे दोन्ही मिळून एक शानदार जोडी बनते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here