वृश्चिक रास : 22-23-24 जानेवारी आनंद गगनात मावणार नाही. दुःखाचा अंतिम संस्कार होणार पण…

0
195

नमस्कार मित्रांनो

मित्रानो २२, २३ व २४ जानेवारी २०२२ हे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये इतका आनंद घेऊन येतील की आनंद गगनात मावणार नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाचा आता होईल अंतिम संस्कार. येणारे हे तीन दिवस तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आठवणीत राहतील असे दिवस असतील. परंतु तुम्हाला काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे लागणार आहे.

पंचांगानुसार या तीनही दिवशी कृष्णपक्ष असून चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी आहे. उत्तरायणाची सुरवात झाल्याने सूर्य मकर राशीत आहेत. पूर्वा फाल्गुनी आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रांचे निर्माण होत आहे.

चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत जात आहे. आणि कन्या नंतर तुळ राशीत. या तीनही दिवशीचे ग्रह गोचर अत्यंत प्रभावशाली आहे. याचा वृश्चिक राशीच्या व्यापार, स्वास्थ्य , कुटुंबीय, विद्यार्थी आणि प्रेमी युगुल दृष्ट्या खूप खास असेल. काय शुभ आणि काय अशुभ कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे पुढे पाहू.

तुमची चांगली-वाईट संगती तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनावर खूप फरक टाकत असते. वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात असलेली संगत एकदा तपासून पहा. तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरणा देणाऱ्या लोकांची संगत करा. जेवढी चादर असेल तेवढेच पाय पसरा.

जेवढी तुमची आवक असेल त्या प्रमाणातच खर्च करा आणि शक्य असल्यास काही सेविंग करा. अनावश्यक खर्चाला आळा घाला. अशा सवयीमुळे तुमच्या वर आर्थिक संकट येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीला विचार न करता कोणतेही वचन देऊ नका. घाईगडबडीत आणि रागात घेतलेला निर्णय सर्व काही उध्वस्त करू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांना अनेकदा अकारण राग येतो. राग तितक्याच लवकर शांत देखील होतो परंतु रागात घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान करतो.

या तीनही गोष्टींचे तुम्ही आयुष्यभर नीट लक्षात ठेवून पालन करा. या तीन दिवसांमध्ये सासर कडून काही आनंदाची वार्ता मिळण्याची शक्यता आहे. सासरकडील लोकांशी वाद विवाद असतील तर ते मिटतील.

जोडीदारासोबत वेळ घालवल्याने आपापसातील प्रेम संबंध मधूर होतील. विवाह इच्छुक लोकांचे लग्न जमण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने कोणती मोठी परीक्षा दिली असेल तर त्याचे रिझल्ट येणार आहेत, जे खूप चांगले असतील.

विनाकारण चिंता करण्याचा हा काळ नाही. अकस्मात होणाऱ्या यात्रेत सावधगिरी बाळगा. भाग्यावर सोडलेले काम नक्की होईल. अनेक आनंद तुमची वाट बघत आहेत. व्यापार उद्योगामध्ये काही व्यर्थ अडथळे आल्याने चिंतेत वाढ होईल. ज्यामुळे तुम्हाला लाभ कमी होईल परंतु अनुभव प्राप्त होईल.

हा अनुभव पुढे भविष्यात आनंदच घेऊन येईल तेव्हा काळजी करू नका. इथून पुढे तुमच्या जीवनातील दुःख तुमच्या पासून दूर राहतील. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना अनेक संधी लाभतील. जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या आली तरीही तुटून जाऊ नका. लोकांची परवा करू नका.

बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. दीर्घ काळ रखडलेले महत्त्वाचे काम या काळात होईल ज्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल. चुकीचे काम अथवा कोणासोबत वाईट वागणे टाळा. सरकारी नोकरदारांना महिला मित्र मंडळाकडून सहयोग मिळेल. कोणता आजार सतावत असेल तर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या.

सट्टा शेअर बाजार यामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे व मित्रांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणी संपतील. तुमचे काही छुपे शत्रू तुम्हाला सतावण्याचा प्रयत्न करतील. डोळसपणे तुम्ही त्यांना ओळखा.

सकारात्मक बदलांसाठी उपाय :

एका लोट्या मध्ये पाणी, दूध आणि गूळ मिक्स करून पिंपळाच्या झाडास अर्पण करावे. रोज सुर्यदेवांना जल द्या. त्यात लाल फुल, कुंकू, अक्षदा मिसळल्या तरीही चालेल. जल अर्पण करताना सूर्य मंत्र व गायत्री मंत्र उच्चारावा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here