वृषभ राशीच्या व्यक्तींची कुठल्या राशीच्या व्यक्तींशी उत्तम प्रकारे मैत्री जमते ? बघा संपुर्ण माहिती

0
333

नमस्कार मित्रानो

वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा अमल असल्याने या राशीत पूर्णपणे शुक्राचे गुणधर्म पहायला मिळतात. वृषभ राशीच्या व्यक्तींचा शरीर विषयक ऐहिक सुखोपभोगाकडे कल असतो. या राशीच्या व्यक्ती सौंदर्य शोधणारी , रसिक आणि नीटनेटकी असतात.

वृषभ राशीची माणसं देखण्या व्यक्तिमत्वाची असतात. गौरवर्णी असतात. चेहरा उत्साही असतो. डोळे मोहक असतात. वृषभ राशीचे पुरुष रुबाबदार , देखणे असतात. वाणीत ऋतुजा असते. तर वृषभ राशीच्या स्त्रिया मादक असतात , लक्षवेधी असतात.

वृषभ राशीची मंडळी खवय्ये असतात. चवीनं खाणारी असतात. खावो पियो मजा करो अशी वृत्ती असते. मित्रमंडळी जमवून मेजवान्या रंगवायला आवडतात. वडिलोपार्जित असणाऱ्या सर्व गोष्टीतून आनंद घेण्याकडे प्रयत्न असतो.

पुरुषांना स्त्री आकर्षण विलक्षण असते. त्यांच्यात उपभोगी वृत्ती असते. पुरुषांना अत्तर , फुलं , सुवासिक तेल , पान अशा एकूण सर्वच प्रकारच्या गोष्टींची आवड असते.विलासी वृत्ती असते. खेळाची आवड असते. ही माणसं चपळ असतात. पाळीव प्राण्यांकडे ओढ असते.

या व्यक्तींमधील सौंदर्यदृष्टी अत्यंत वाखाणण्याजोगी असते. त्यांना रंगसंगतीची जाण असते. व्यवस्थितपणा , टापटीपपणा त्यांच्यात भिनलेला असतो. शिक्षणाकडे ओढ कमी असते. श्रीमंती थाटात राहायला आवडते. शेती , बागबगीचे याकडे कल अधिक असतो.

या राशीच्या व्यक्ती खूपच व्यवहारी, हिशेबी, प्रॅक्टीकल आणि हट्टी असतात. परंतु यांची इच्छा शक्ती विश्वास, चिकाटी, एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्तीमुळे या व्यक्ती प्रतीकूल परीस्थितीमध्येही चांगल्या रितीने टिकून राहतात.

आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही खूप कष्ट करतात. त्यामध्ये प्रेम, प्रामाणिकपणा असतो.या मंडळींना स्पर्धात्मक पातळीवर आव्हानं स्वीकारायला आवडतात.व्यवहार कुशलते बरोबर काम करण्याची चिकाटी असते. तुम्ही निर्मीतीक्षम, सर्जनशील आहात. तुमची सहनशीलता आणी आशावाद जबरदस्त आहे. सगळया जगातल्या सुखसोयी तुम्हाला हव्या अस्तात.

या राशीच्या व्यक्तींना सहसा कोणाशी शत्रुत्व करायला आवडत नाही. पण जर यांचे कोणी शत्रू झाले तर हे लोक थेट बैलाप्रमाणे शिंगावरच घेतात.वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक मानली जाते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडतो. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार इ. यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात.

मित्रानो वृषभ राशीच्या व्यक्तींचे कर्क , तुळ किंवा मीन राशीच्या व्यक्तींशी उत्तम पटते. मात्र वृषभ राशीच्या व्यक्तींचे मेष , सिंह , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ राशींच्या व्यक्तींशी फारसे पटत नाही.

बहुतेक ठिकाणी या राशींशी पटताना दिसले तरी ते मनापासून नसेल. याला मन मारून जगणे असे म्हणतात.कारण वृषभ राशींच्या व्यक्तींना कडक शिस्त , भांडणे , रागीटपणा , कंजूसी , अरसिकपणा आवडत नसतो. असे अनेकदा दिसून आले आहे.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here