नमस्कार मित्रानो
मित्रानो वृषभ हि राशीचक्रातील दुसरी राशी असून शुक्र हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीच बोध चिन्ह आहे ते म्हणजे बैल. अत्यंत बलवान प्राणी. शेतकऱ्याचा मित्र म्हणून या बैलाची ओळख आहे. अंगामध्ये प्रचंड ताकद आणि कामाची रग असलेला प्राणी. दिवसभर राब राब राबणारा तर संध्याकाळी निवांत गोठ्यात रवंथ करत बसलेला. या बैलाच्याच गुणधर्माप्रमाणे वागणाऱ्या असतात ते म्हणजे वृषभ राशीचे मंडळी.
आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी या वृषभ राशीच्या लोकांमध्ये असते. परंतु डोक्यावर आणि खांद्यावर जबाबदारीच ओझं आल्या नंतरच यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला लागते. नाही तर बऱ्याचदा विश्रांती मध्येच सुख मानणारी हि राशी आहे.
व्यापारामध्ये जास्त सहभागी होणारी हि राशी असून कलाक्षेत्रामध्ये विशेष रमणारी हि राशी आहे. कलेची दृष्टी यांना अगदी निसर्गतः असते. पृथ्वी तत्वाची हि राशी असल्यामुळे आपल्या निर्णयावर बर्यापकी हि मंडळी ठाम असतात.
मित्रानो सप्टेंबर महिन्यामध्ये गुरूच राशीला होणारे जे भ्रमण आहे हे कर्म आणि भाग्य स्थानातून होणार आहे. तर रवी , बुध , मंगळ आणि शुक्र ग्रहांच भ्रमण हे राशीला चौथ , पाचवं आणि सहावं होत असल्यामुळे हा महिना अत्यंत सुखकारक ठरणार आहे.
सप्टेंबर महिन्यात रवी , बुध आणि शुक्र ग्रहाच भ्रमण हे आहे ते पंचम आणि षष्ट स्थानातून होणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला आर्थिक बाबतीत चांगला दिलासा मिळणार आहे. शुक्राची साथ असल्यामुळे नवीन कामकाज , नवीन व्यापार सुरु करण्यासाठी उत्तम लाभदायक ठरेल. हा संपूर्ण महिना आर्थिक लाभाचा ठरेल.
कामाची मात्र योग्य आखणी करून निर्णय घेतल्यास आर्थिक प्रगतीचा वेग झपाट्याने वाढायला मदत होईल. या महिन्यात १४ तारखेनंतर भाग्यात येणारा गुरु आणि ५ तारखेनंतर स्वतःच्या राशीत येणारा शुक्र आर्थिक भाग्य वाढवणारा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक निर्णय , आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे.
परदेशात नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी किंवा परदेशात नोकरी मिळत असेल तर ती संधी सोडू नका. यासाठी काळ अतिशय उत्तम आहे. नवीन नोकरी , नवीन व्यापार , नवीन गुंतवणूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करत असल्यास अवश्य हा सप्टेंबर महिना तुम्ही विचारात घ्यायला अजिबात हरकत नाही.
शेयर मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर ग्रहांची साथ उत्तम आहे. परंतु भाग्यातील गुरु आणि तूळ राशीतून जाणारा शुक्र या महिन्यात शॉर्ट टर्म गुंतवणूक तसेच ट्रेडिंग मध्ये विशेष लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. त्यामुळे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हि खुशखबर म्हणायला हरकत नाही. सोन्यात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन फायदेशीर ठरेल.
शेतीची जमीन , बांधकामाची जमीन , ऍग्रिकल्चरल – नॉन ऍग्रिकल्चरल जमीन तसेच घरामध्ये गुंतवणूक करणार असल्यास या महिन्याचा विचार करू शकता. घरा संबंधी नवीन खरेदी विक्री संबंधी योग्य संधी याच महिन्यात मिळणार आहे. नवीन घर भाड्याचं शोधत असाल किंवा विकत घेऊ इच्छित असाल तुमचा शोध या महिन्यात पूर्ण होईल.
मंगळाच सुख स्थानातील भ्रमण घर आणि वाहन या बाबतीत नेहमीच शुभ परिणाम देत असत. नवीन वाहन खरेदीचा योग यामुळेच आपल्याला आलेला आहे. या महिन्यातील पहिला पंधरवडा घरात काही अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. त्यामुळे कुटुंब संबंधात थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण महिना शुभकारक राहणार आहे. कॉमर्स , बँकिंग आणि कला या विषयातील विद्यार्थ्यांना हा महिना अधिक शुभकारक राहील. तसे पण बँकिंग , इन्शुरन्स , मार्केटिंग , कला , नाट्य , सिनेमा त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट , इव्हेंट मॅनेजमेंट , फोटोग्राफी हि जी क्षेत्रे आहेत ती मुळातच वृषभ राशीला उत्तम यश मिळवून देणारी आहेत.
विवाह इच्छुक मंडळींना शुक्र आणि गुरुची साथ असल्यामुळे जोडीदाराचा शोध सुद्धा या महिन्यात घ्यायला काही हरकत नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांची मते सांभाळून घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही शुल्लक गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागणार आहे. त्यामुळेच घरात शांतता राहू शकते.
या महिन्यात जर आपण आरोग्याचा विचार केला तर घशाचे आजार , पाठीच्या मणक्याच्या संदर्भातले आजार विशेष त्रास देऊ शकतात. म्हणून या महिन्यात तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या महिन्यातील शुभ तारखा असणार आहेत १ ते ९ , १२ , १३ , १४ , १७ ते २३ आणि २६ ते ३०.
या महिन्यातील अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी तर शुभ ग्रहांचे परिणाम अजून शुभ करण्यासाठी जर रोज नवग्रह स्तोत्राचे पाठ या संपूर्ण महिन्यात केल्यास अतिशय शुभ परिणाम मिळतांना दिसतील. तसेच बुधवारच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचं पठण अवश्य कराव . संध्याकाळच्या समयी देवाजवळ तुपाचा दिवा लावून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकांचे पाठ अवश्य करावेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.