नमस्कार मित्रानो
वृषभ आणि वृश्चिक राशीचे नाते हे इतर राशीच्या जोडप्यांपेक्षा वेगळे आहे कारण या दोन्ही राशीचे व्यक्तिमत्व अगदी मजबूत आहे. या दोन्ही राशी एकमेकांना भरपूर प्रेम देतात.
आपल्या वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करण्याचा या दोन्ही राशी नेहमी प्रयत्न करतात. गोष्ट कोणतीही असो दोन्ही राशी नेहमी पुढे राहणे पसंद करतात. स्वतःच्या भावना लवकर व्यक्त करत नाहीत पण आतल्या आत खूप गंभीर स्वरूपाचं नातं निर्माण करतात.
या दोन्ही राशीच्या जातकांना कोणत्याही प्रकारच्या संकटातून माघार घेणे आवडत नाही. स्वतःच्या बळावर संकट मुक्त होण्याची कला यांच्यात अवगत असते म्हणूनच या दोन्ही राशी एकमेकांसाठी एकदम परफेक्ट समजल्या जातात.
जेव्हा यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारची कटुता नसते तेव्हा हे जोडपे प्रेमाचे एक उत्तम उदाहरण बनतात. पण जर नात्यात दुरावा आला तर हे दोघे एकमेकांसाठी घातक देखील ठरू शकतात.
दोघेही प्रबळ विरोधक म्हणून उत्तम भूमिका बजावू शकतात. त्यांचे परस्पर संबंध अस्थिर, प्रतिकूल आणि भावनिकदृष्ट्या वाईट देखील होऊ शकतात कारण दोघांच्या वैचारिक स्थितीत परिस्थिती नुसार बदल होऊ शकतात .
दोघेही एकमेकांशी सतत भावनिक आणि बौद्धिक दृष्ट्या जोडलेले असू शकतात आणि दोघांमध्ये अनेक शंका देखील निर्माण होऊ शकतात. पण या दोन्ही नात्यांमध्ये निष्ठेचा दर्जा चांगला असतो. त्यामुळे या दोघांमध्ये बेवफाई हा मुद्दा येत नाही. या दोन्ही राशींना एकमेकांना त्रास देणे आवडत नाही परंतु कधी कधी अशा प्रसंगांना पण यांना सामोरे जावे लागू शकते.
या दोघांमध्ये प्रणय आणि नातेसंबंध चांगले असतात कारण दोन्हीमध्ये समान ऊर्जा कार्य करते. वृषभ, शुक्रच्या प्रभावाखाली असल्याने यांना असा जोडीदार हवा असतो जो नेहमीच सतर्क असतो आणि नातेसंबंधात एकमेकांच्या भावनांची कदर करेल अशा जोडीदाराच्या शोधात असतात. अशा स्थितीत हे गुण यानं वृश्चिक राशीकडून मिळू शकतात. जेव्हा संवादाचा प्रश्न येतो, तेव्हा या दोघांमध्ये बरेच अडथळे येऊ शकतात.
एकूणच, या दोन्ही राशी म्हणजे एक आव्हानात्मक जोडी आहे. दोघांना नात्यात संतुलन राखण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते कारण दोन्ही शक्तिशाली राशी आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध आहेत. नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी यांना वेळ लागू शकतो कारण दोन्ही राशी थोड्या फार हट्टी स्वभावाच्या असल्यामुळे नाते सुरळीत व्हायाला वेळ लागू शकतो.
दोघांनाही त्यांच्या राग आणि जिद्दीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एकत्र राहायचं असेल तर जिद्दी स्वभावाने राहून चालणार नाही. नाते कुठलेही असो नात्यात संतुलन खूप महत्वाचे आहे.
जर या दोन्ही राशींना एकत्र राहायच असेल तर दोघांनाही नतमस्तक व्हावे लागेल, तरच चांगले संबंध बनतील. वृषभ आणि वृश्चिक राशीचे लोक एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात, परंतु नाते पुढे चालू ठेवण्याआधी एकदा या गोष्टींचा नक्की विचार करावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.