नमस्कार मित्रानो
मित्रानो कन्या हि राशीचक्रातील सहावी राशी असून याचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशीचा वर्ण आहे वैश्य म्हणजे व्यापार. हे असल्यामुळे आर्थिक नियोजन , व्यापार , बँकिंग क्षेत्रात या व्यक्तींना मनापासून आवड असते. बुध या राशीमध्ये अतिशय हुशार आणि चिकित्सक फळ देताना दिसतो. त्यामुळे हि मंडळी अतिशय तीक्ष्ण व चिकित्सक स्वभावाची या राशीवर जाणवतात.
या राशीचे लोक समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवत नाहीत. स्वतः संपूर्ण माहिती व अभ्यास करूनच निर्णय घेण्याकडे यांचा कल राहतो. हि राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांचा आणि आवश्यक गोष्टींचा अभ्यास तसेच संचय करायला या व्यक्तींना फार आवडते.
ज्या कामांमध्ये सूक्ष्म निरीक्षण असते , ज्या कामात जास्त लक्ष द्यावे लागते अशी कामे या मंडळींना जास्त भावतात. या राशीचे नामाक्षर जे आहे ते प वरून सुरु होणार आहे. या राशीचे नक्षत्र म्हणजे उत्तरा , हस्त आणि चित्रा. या महिन्यात शुभ आणि अशुभ या दोन्ही प्रकारचे अनुभव अनुभवायला मिळणार आहेत.
मित्रानो महिन्याच्या सुरवातीलाच बुध आणि रवी लाभातून जात आहेत. परंतु बुध ८ ऑगस्ट पर्यंतच लाभातून जात आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार या आधीच पूर्ण करणे उत्तम ठरेल. व्यापारी वर्गाने सुद्धा या आधीच सर्व महत्वाची कार्य करून घेणे उत्तम.
नोकरीच्या स्थानावरून मंगळाची जी दृष्टी आहे त्यामुळे नोकरीच्या घरात गुरु ग्रह असल्यामुळे नोकरदार वर्गाला मात्र हा महिना शुभकारक राहणार आहे. मंगळ ग्रहाची साथ या महिन्यात लाभल्यामुळे नवीन कामांची सुरवात करायला काहीच हरकत नाही.
मित्रानो शेवटच्या 15 दिवसांत रवी , मंगळ आणि बुध या ग्रहांची साथ परदेशात नोकरी किंवा व्यापार करणाऱ्या मंडळींना विशेष शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. इम्पोर्ट एक्स्पोर्ट च्या कामाला शेवटच्या पंधरा दिवसात विशेष गती प्राप्त होईल.
परदेशात नोकरी शोधत असाल तर या महिन्यात विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक. योग अतिशय सुंदर जुळून आलेले आहेत. शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणार्यांनी सुद्धा बऱ्या पैकी सावधानता ठेवायची आहे. ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींनी खूपच सांभाळून या महिन्यात ट्रेड करायचे आहेत.
शेतीच्या कामाला सुद्धा या महिन्यात लाभ अतिशय सुंदर आहेत. घाईने कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करू नका. नजर हटी दुर्घटना घटी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कागदपत्रांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता या महिन्यात सर्वात जास्त आहे. बँकिंग फ्रॉड पासून सावध रहा.
11 ऑगस्ट नंतर बदलणारा शुक्र नीच राशीमध्ये येत आहे. हाच आहे पैशाचा व्यवहाराला सांभाळा सांगणारा ग्रहयोग. आर्थिक व्यवहार म्हणजेच पैशांचे व्यवहार 11 नंतर फार म्हणजे फार सांभाळून करा. कारण शुक्राचा असणार भ्रमण अशुभत्व निर्माण करत. उसने व्यवहार अकरा तारखे नंतर पूर्णपणे टाळलेले हिताचे ठरेल.
विवाह इच्छुक मंडळींनी विवाहाचे निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नका. विद्यार्थी वर्गाने सुद्धा सर्व माहिती गोळा करूनच शैक्षणिक क्षेत्रात निर्णय घ्यायचे आहेत. निर्णय घेताना घाई गडबड करणे टाळावे लागेल. डोकं शांत ठेवून निर्णय घेतले तर पुढे जाऊन फायदा होईल.
या महिन्यात आरोग्याचा विचार केला तर पोटांच्या तक्रारी डोकं वर काढू शकतात. अल्सर , कावीळ , आतड्यांचे विकार या संदर्भा मध्ये फार काळजी घेणे गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे होणारे त्रास सांभाळायचे आहेत.
या महिन्यातील अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकाचे पाठ दिवसातून तीन वेळा अवश्य करावेत. सोबतच गुरुचरित्रातला अठरावा अध्याय अगदी रोज वाचनात आला तर सोन्याहून पिवळे होईल. वेळ नसेल तर शनिवार , सोमवार आणि गुरुवारी वेळ काढून अध्याय वाचावा.
या महिन्यातील शुभ तारखा आहेत 2 ते 9, 12 ते 22 , 25 , 26 , 30 , 31 .
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशी भविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.