नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला असा एक सोप्पा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे गच्च झालेले नाक 5 सेकंदात होईल मोकळे, घशातील संसर्ग फुफ्फुसापर्यंत न जाता घशातच होईल नष्ट.
मित्रांनो पिण्याच्या पाण्यातील बदलामुळे, फ्रिज मधील थंड पाण्यामुळे किंवा फ्रिज मधील थंड पदार्थ खाल्ल्यामुळे, फॅन, एसी किंवा कुलरच्या हवेमुळे किंवा इतरांच्या संपर्कात आल्यामुळे झालेलं व्हायरल इन्फेक्शन 3 ते 4 दिवसात मुळापासून नष्ट करणारा आजचा हा उपाय आहे.
याशिवाय छातीतील, घशातील कफ नाहीसा करून ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची ताकद या उपायामध्ये आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कसा करायचा आहे हा उपाय.
सर्दी खोकल्यासारख्या व्हायरल इन्फेक्शनवर गुणकारी असा हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आवश्यक आहे लसूण. भाजीमध्ये फोडणीसाठी वापरला जाणारा लसूण कच्चा खाल्ल्याने आपल्या शरीराला याचे अत्यंत फायदे होतात.
लसणामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते. याशिवाय यातील पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम हे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार मदत करतात.
श्वसनासंबंधीचे विकार खोकला, अस्थमा यासारख्या आजारावर लसूण फारच गुणकारी असतो. कच्चा लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होऊन रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता देखील वाढते.
अशा या लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून आपल्याला या उपायाठी घ्यायच्या आहेत. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मिरची पावडर. या पावडर मध्ये इम्युनिटी वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात.
ठराविक प्रमाणात लालमिर्चीचे सेवन आपल्या शरीरासाठी निश्चितच फायद्याचे असते. उपायासाठी एक चिमटी मिरची पावडर घ्यायची आहे. शक्यतो घरीच बनवलेली मिरची पावडर घ्यायची आहे.
उपायासाठी लागणारा तिसरा घटक म्हणजे लिंबू. लिंबामधील व्हिटॅमिन सी शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ठराविक प्रमाणात आणि योग्य त्या अनुपानासोबत लिंबाचे सेवन आपल्या शरीरासाठी नक्कीच फायद्याचे असते.
उपायासाठी साधारण एक चमचा लिंबाचा रस काढून मिश्रणात टाकायचा आहे. यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे मध. छातीतील कफ नाहीसा करून खोकल्याची उबळ थांबवण्यासाठी मध अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक औषध आहे.
एक चमचा एवढे मध आपण मिश्रणात टाकायचे आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रांनो लसूण, मिरची, लिंबू या पदार्थांचे आपण रोज सेवन करत असलो तरी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी याचे सेवन केल्याने त्या रामबाण औषध म्हणून कार्य करतात.
सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन झाल्यानतंर नेहमी गरम कोमट पाणी पिले पाहिजे. जेणेकरून हे व्हायरल इन्फेक्शन झटपट आटोक्यात येते. याशिवाय योगासने आणि प्राणायाम केल्याने आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
आता हि तयार झालेली पेस्ट जेवणानंतर खायची आहे. सकाळ संध्याकाच्या जेवणानंतर हि पेस्ट बनवून खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ किंवा पिऊ नये.
लहान मुलांना देताना अर्धा चमचा पेस्ट द्यायची आहे. सलग 3 ते 4 दिवस हा उपाय केल्यानंतर सर्दी, खोकला, छातीतील कफ पूर्णपणे बरा होईल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.