या वेलीचा एक तुकडा जवळ ठेवा, सर्व कामे 7 दिवसात पूर्ण होतील…

0
647

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत जो केल्याने आपली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्याला एका वेलीचा तुकडा फक्त आपल्याजवळ ठेवायचा आहे. हा वेलीचा तुकडा कशाप्रकारे आपली मदत करतो ते स्वतः तुम्ही अनुभवाल जेव्हा हा तुकडा तुम्ही स्वतः जवळ ठेवाल. पण याचा अर्थ असा नाही कि हा तुकडा जवळ ठेवायचा आणि काहीच करायचं नाही. प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही.

मित्रांनो जीवन जगत असताना कर्म चांगली असणे अत्यंत महत्वाचे असते. कित्येकदा असे होते कि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण लाख प्रयत्न करतो परंतु आपल्याला सफलता मिळत नाही. अशा परिस्थितीत आपले प्रयत्न जरी 100 टक्के असले तरी आपले भाग्य कमजोर असते. मित्रांनो निसर्गात अशा काही वस्तू असतात ज्या आपल्याजवळ किंवा घरात ठेवल्याने आपल्या प्रयत्नाना शक्ती प्राप्त होते.

मित्रांनो समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी चालत पोहचायला अर्धा तास लागतो. याउलट जर तेच अंतर आपण गाडीने पार पाडले तर पाच मिनिटांतच ते अंतर पूर्ण होते. याचप्रमाणे तंत्रमंत्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत जे आपले भाग्य मजबूत होण्यासाठी मदत करतात. आपली कार्य पूर्ण होण्यासाठी साहाय्य करतात. फक्त आपली पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. आता जाणून घेऊया आजच्या उपायाविषयी.

आजच्या उपायासाठी जी वस्तू उपयोगात आणणार आहोत ती आहे एका वेलीचा तुकडा. वेल जिला आपण लता देखील म्हणतो. मित्रानो आपण पाहिले असेल कि बऱ्याच वृक्षांच्या अवती भोवती अनेक वेली उगवतात. त्या वेली वृक्षांचा आधार घेऊन वरच्या बाजूला वाढतात. हा आधार मिळणे हे त्या वेलीच्या प्रकृती मध्ये असते. ज्या प्रमाणे आधार घेऊन ती वाढते त्याचप्रमाणे दुसऱ्यांना आधार देण्याची खासियत पण या वेलींमध्ये असते.

मित्रांनो आपल्याला शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी आपल्या हाताच्या बोटाच्या जाडीचा 3 इंच लांबीचा एक वेलीचा तुकडा घ्यायचा आहे. पण हा वेलीचा तुकडा जे वेल वडाच्या झाडाखाली उगवले असेल, जे वेल वडाच्या झाडाचा आधार घेऊन वर चढले आहे अशा वेलीचा 3 इंच लांबीचा हाताच्या बोटाच्या जाडीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. हा तुकडा बोटाच्या आकाराचा असावा बारीक नसावा.

एखादे असे वडाचे झाड पाहून ठेवा कि त्याच्यावर वेल चढली आहे. तर मित्रांनो अशा वडाच्या झाडाला सप्तमीच्या दिवशी जायचे आहे. आणि जाताना थोडे पिवळे तांदूळ घेऊन जायचे आहे. पिवळे तांदूळ म्हणजे हळदीने रंगविलेले तांदूळ. हे तांदूळ वडाच्या झाडाला अर्पित करायचे आहेत. वडाच्या झाडाला आणि वेलीला प्रार्थना करायची आहे कि अष्टमीच्या दिवशी मी आपल्यला नेण्यास येत आहे. तरी कृपा करून आपण माझ्या सोबत माझ्या घरी यावं.

यानंतर शुक्ल पक्षामधील अष्टमीच्या दिवशी यावेलीचा तुकडा आणण्यासाठी जावे. वेलीचा एक तुकडा कापून आपल्या घरी घेऊन यायचा आहे. घरी आणल्यानंतर हा तुकडा पिंपळाच्या पानांच्या रसात भिजवायचा आहे. रस आधीच बनवून ठेवावा. मित्रांनो वडाच्या झाडामध्ये शिव आणि पार्वतीचा वास असतो. तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो. वडाच्या झाडावर आलेल्या वेलीमध्ये पूर्णत्वाचा वास असतो. या क्रियेमुळे सर्व शक्ती आपल्या घरात येतात.

मित्रांनो हा वेलीचा तुकडा कमीत कमी 24 तास पिंपळाच्या पानांच्या रसात भिजवत ठेवायचा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी हा तुकडा त्या रसामधून काढायचा आहे. वेलीचा तुकडा कपड्याने पुसून कोरडा करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्या देव्हाऱ्यात हा तुकडा ठेवून धूप दीप दाखवायचे आहे. पिवळे फुल वाहावे. जशी नियमित पूजा करता तशी त्या तुकड्याची पूजा करावी.

यानंतर हा तुकडा आपण आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा. 7 दिवसांच्या आत जे पण आपले अडकलेलं काम आहे कार्य आहे ते पूर्ण होऊन जाईल. जसे कि नोकरीचे कॉल लेटर, लग्न ठरण्यात अडचणी, शत्रू त्रास देत असेल, पैसे येणे बाकी आहेत इत्यादी. कोणतेही काम असुदे आपण ज्या मनोकामनेने हा तुकडा आपल्या पाकिटात ठेवाल तुमचं ते काम पूर्ण होईल.

मित्रांनो जर का तुम्ही हा तुकडा धनप्राप्तीच्या उद्देशाने आणत असाल तर लक्षात ठेवा हा तुकडा आपल्या जवळ ठेवल्यानंतर तुमची भेट एखाद्या धनाधीश, संपत्ती असणाऱ्या व्यक्तीशी होईल. आणि त्याच्या सहयोगाने तुमची सर्व कार्य सुरळीत होतील. या लाकडाच्या तुकड्यात फार गुण आहेत. जी इच्छा तुम्ही बोलून दाखवता ती इच्छा 7 दिवसाच्या आत पूर्ण होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here