नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येक जण देवघरात दिवा सकाळ, संध्याकाळ रोज लावत असतो. आपल्याला फक्त एक चमचा आयुर्वेदिक चूर्ण या दिव्यात टाकायचं आहे. हे चूर्ण सहजरित्या आयुर्वेदिक मेडिकल मध्ये सहजरित्या उपलब्ध होते.
हे चूर्ण दिव्यातील तेलात टाकल्याने तुमचे घर पूर्णपणे निर्जंतुक होईल. घरामध्ये माशी, मच्छर, झुरळ, डास किंवा पाली आणि इत्यादी जे कीटक असतात ते पूर्ण पणे निघून तर जातीलच शिवाय याचा मानवी शरीरासाठी सुद्धा जबरदस्त फायदा आहे.
तुम्हाला सायनसचा त्रास असेल, कशाची ऍलर्जी असेल, सतत शिंका येणे, अर्ध डोकं दुखणे त्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी या वनस्पतीचा वास इतका जबरदस्त आहे कि या वासामुळे तुमचा मेंदू आणि मज्जातंतू उत्तेजित होऊन अधिक चांगल्या रीतीने कार्य करतो.
सतत चिडचिड होणे, मानसिक थकवा जाणवणे तो आपल्याला जाणवणार नाही. आपण बरेच प्रोडक्ट वापरत असाल माश्या, मच्छर घालवण्यासाठी. पण मित्रांनो असे बाजारात मिळणारे प्रोडक्ट हे केमिकल युक्त असतात.
असे केमिकल युक्त प्रोडक्ट वापरल्याने ते श्वासावाटे शरीरात जातात व परिणामी कालांतराने श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे यासारखे आजार उदभवू शकतात.
परंतु हि जी वनस्पती आहे या वनस्पतीचे चूर्ण जर आपण दिवा लावताना त्यात टाकले तर शरीराला सुद्धा खूप सारे फायदे होतात. तर हे चूर्ण कोणते आहे याचा वापर कसा करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो ते चूर्ण म्हणजे वेखंड पावडर. हि वेखंड पावडर सुगंधी असते. तसेच आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. हे वेखंड कीटकनाशक म्हणून सुद्धा ओळखले जाते. म्हणून पूर्वीच्या काळी माश्या, मच्छर पाल यांपासून संरक्षण होण्यासाठी घरात वेखंड जाळण्याची प्रथा होती.
घरामध्ये जाळून धूर करण्यापेक्षा दिव्यामध्ये जर आपण हि वेखंड पावडर टाकली तर त्याचा वास सतत निरंतर येत राहतो. मित्रानो मानवी मेंदू आणि मज्जासंस्था साठी अत्यंत उपयुक्त आहे.
तुम्ही दिवा लावण्याआधी वाटीत दिव्यापुरते तेल किंवा तूप घेऊन त्यात एक चमचा वेखंड चूर्ण मिक्स करू घ्यायचं आहे.लक्षात घ्या जर तुम्ही यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर केला तर याचा परिणाम अधिक होतो.
तूप आणि वेखंड या दोन्ही घटकांचा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. घर निर्जंतुकी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर होतो. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अर्ध डोकेदुखी या सर्वांवर प्रभावी रित्या परिणाम होतो.
असा वेखंड पावडर मिश्रित तुपाचा दिवा कमीत कमी 7 दिवस आपल्याला लावायचा आहे. तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होईल. असा हा साधा आणि सोप्पा उपाय तुम्ही नक्की करा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.