नमस्कार मित्रांनो,
वटपौर्णिमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीचा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात.
मित्रांनो या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरो ग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना वडाच्या झाडाला करतात.
बऱ्याचदा आपण वट पौर्णिमेच्या पूजेसाठी सर्व तयारी करतो व अचानक मासि क पाळी येते, तेव्हा असा प्रश्न पडतो की पूजा करावी की नको? हे व्रत स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे असते जे महिला खूप श्रद्धेने व उत्साहाने करतात.
पण जर मासिक पाळी आली तर स्त्रियांना टेन्शन येते, पण काळजी करू नका. आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार महिला या दिवशी उप वास करू शकतात. तसेच पूजेसाठी बाहेर न जाता घरी वडाच्या झाडाची छोटी फांदी आणून त्याचे पूजन करा. अगदी सर्व विधी त्यासोबत कराव्यात.
अशा प्रकारे तुम्ही हे वटसावित्रीचं व्रत करू शकता. पूजेमध्ये साहित्य काय वापरावे यामध्ये बऱ्याच स्त्रियांचा गोंधळ असतो. त्यामुळे अशा प्रकारे साहित्य वापरून तुम्ही हा गोंधळ दूर करू शकता.
पूजेसाठी एक छान ताट किंवा थाळी घ्या व त्यामध्ये सौभाग्याचे रूप असणारे सौभाग्य अलंकार, हिरव्या बांगड्या, काळे मणी, ओटीसाठी गहू, भरलेली फळे, हळदी कुंकू, अक्षता, फुले, गजरा, सुपारी, दोरा, आरती, कापसाची फुलवात इ साहित्य पूजेसाठी घ्यावे.
एक कलश स्वच्छ जल प्रथम वडाच्या झाडाला अर्पण करावे. यानंतर यथाविधी पूर्ण श्रद्धेने पूजा करावी. हळदी-कुंकू, काळे मनी, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोरा घेऊन वडाच्या झाडाच्या भोवती 7 फेऱ्या माराव्यात व पुढील सात जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करावी. 5 किंवा 7 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. अशा प्रकारे पूजा करून प्रार्थना व नमस्कार करा व त्या दिवशी फलाहार घ्यावा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मैत्रिणींसोबत शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.