वटसावित्री पौर्णिमा 2021… ही कामे चुकूनही करू नका…

0
3923

नमस्कार मित्रांनो,

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. हे व्रत विशेषतः सुवासिनी महिलांसाठी खूप महत्वाचे असते. या वर्षी वटपौर्णिमा 24 जून या तारखेला येत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन केल्यास आपल्याला सुख व सौभाग्याची प्राप्ती होते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया या दिवशी काय करावे व काय करू नये ते.

वटसावित्री व्रत हे 24 जूनला गुरुवारी असणार आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 23 जूनला उत्तर रात्री 3 वाजून 32 मिनिटांनी होणार असून पौर्णिमा तिथीची समाप्ती 24 जूनला गुरुवारी रात्री 12 वाजून 9 मिनिटांनी होणार आहे. म्हणून 24 जूनला गुरुवारी दिवसभर आपण कधीही पूजन करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया वटसावित्री व्रताचे पूजन कसे करावे.

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानविधी उरकून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. व्रताचा संकल्प करून पूजनाची तयारी करावी.

या दिवशी विशेषतः वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. यासाठी एका ताटात हळद कुंकू, धूप, दीप, फळे, कापडाची वस्त्रे, गणपती बाप्पा, घंटी, कापूर, अगरबत्ती, कच्चा दोरा, दूध, शुद्ध पाणी, थोडेसे गहू, फुले, सौभाग्य अलंकार पहिली वटसावित्री असेल तर एक पीस, गहू, नाणे असे ओटीचे सामान घेऊन संपूर्ण ताट तयार करावे.

त्यानंतर वडाच्या झाडाखाली जाऊन विधिवत प्रमाणे वडाच्या झाडाचे पूजन करावे. वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालाव्यात व कच्चा दोरा गुंडाळावा. त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकावी. त्यानंतर आरती करून 5 किंवा 7 सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरावी. वटसावित्री व्रताचे सुवासिनी महिलांच्या जीवनात फार महत्व असते.

या दिवशी स्त्रियांनी काही नियमांचे पालन केले तर त्यांना सुख व सौभाग्याची प्राप्ती होते. या दिवशी घरातील वातावरण शांत, शुद्ध व आनंदी ठेवण्याचा प्रयन्त करावा. कोणत्याही प्रकारे घरातील वातावरण बिघडणार नाही व घरात वाद विवाद भांडणे होणार नाहीत असे वर्तन करावे. घरात स्वछता व पवित्रता ठेवावी.

या दिवशी कोणत्याही प्रकारचे चुकीचे विचार मनात आणू नयेत. या दिवशी सुवासिनी स्त्रियांचा उपवास असतो. परंतु घरातील इतरांनी देखील सात्विकच भोजन करावे. तामसिक भोजनाचा त्याग करावा. सोबतच आपले वर्तन देखील सात्विकच असावे. या दिवशी कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर करू नये. आपल्या पेक्षा मोठे असो किंवा लहान असो त्यांचा अपमान करू नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. असाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here