औदुंबराची ही एक गोष्ट नेहमी जवळ ठेवा..बघता बघता पैशांचा ढीग लागेल

0
252

ॐ श्री गुरुदत्ताय नमः ||

नमस्कार मित्रांनो, औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची ही एक गोष्ट तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवा. पैसा तुमच्या घरात अचानक आपोआप यायला सुरुवात होईल. तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. तुमच्या जीवनातील अकारण येणाऱ्या समस्या संपून जातील आणि सुख समाधान सर्व काही येऊ लागेल.

माता लक्ष्मीची अस्सीम कृपा तुम्हाला प्राप्त होईल. या उपायामुळे कोणाही व्यक्तीला बाधा झाली असेल किंवा अकारण भीती वाटत असेल तर त्याचेही निवारण होईल. इतकेच काय तर ही वस्तू धारण केल्याने सर्व ग्रह दोष निघून जातील.

कर्जमुक्तीच्या उद्देशाने जर तुम्ही ही वस्तू धारण केली तर तुमचे सर्व कर्ज संपेल आणि तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला मानला गेला आहे.

आपल्या आजूबाजूला वाईट शक्तींचा वास आहे असा भास होत असल्यास आजच्या या लेखामधील माहितीचा देखील उपाय तुम्ही करू शकता. औदुंबर वृक्षाची ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील भांडणे, कलह, वाद-विवाद, तंटे बंद होऊन त्याचे रूपांतर प्रेममय वातावरणात होऊन मानसिक शांतता लाभते.

चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती आहे ती वस्तू ज्यामुळे आपले सर्व अडलेले कामं त्वरित व्हायला लागतील. हा उपाय तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी अथवा शुक्रवारी किंवा गुरुपुष्यामृत योग असेल त्यादिवशी करू शकता.

उपाय करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी तुम्हाला औदुंबर वृक्षा जवळ जाऊन पिवळे तांदूळ (हळदीने पिवळे केलेले तांदूळ), पिवळी फुले आणि थोडेसे पाणी अर्पण करून, मनोभावे प्रार्थना करायची आहे की, ‘मी उद्या पूजेसाठी तुमचे मूळ नेत आहे तरी उद्या आपण माझ्यासोबत यावे.

आम्हाला आशीर्वाद द्यावा.’ दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रात:विधी आटपून औदुंबराचे मूळ आपल्या घरी घेऊन या. या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून आणला तरीही चालेल.

हे मूळ स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने साफ करावे. ते मूळ आपल्या देवघरामध्ये पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर चना डाळ ठेवून त्यावर ठेवावे. त्या मुळाची विधिवत पूजा करावी.

पूजा झाल्यावर त्या मुळाला मनोभावे प्रार्थना करावी जे काही अडलेली कामे असतील, ग्रह दोष, संतानप्राप्ती, कर्जमुक्ती कोणतेही काम असू दे ते दूर होण्यासाठी त्याचे निवारण होण्यासाठी प्रार्थना करा.

एका चांदीच्या किंवा स्टीलच्या डबी मध्ये हे मुळ कुंकू घालून ठेवावे. ही डबी देव घरातच ठेवून याची नित्यनियमाने पूजा करावी. या प्रभावशाली उपायामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतील.

महालक्ष्मीची कृपा बरसून घरात पैसा येऊ लागेल. घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

अनामिक भीती असेल तर एका धाग्यामध्ये हे मूळ बांधून तो धागा तुम्ही गळ्यात देखील धारण करू शकता. औदुंबर वृक्षांमध्ये साक्षात श्री दत्तात्रेयांचा वास असतो. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या सर्व इच्छा अवश्य पूर्ण होतील. शुभं भवतु!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here