फक्त 3 वेळा करा उपाय… उधार घेऊन पळून गेलेला मित्र स्वतः येऊन पैसे देईल परत…

0
343

नमस्कार मित्रांनो,

बऱ्याचदा काही अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करतो. ही मदत आर्थिक स्वरूपात सुद्धा असते. काही वेळेस आपण पैसे उधार देतो किंवा परत देण्याच्या मुदतीवर उसने देतो व आपल्या काही व्यक्तींना अशी मदत करतो. कारण जीवनात अडचण ही सर्वांनाचं असते त्यामुळे आपण चांगल्या भावनेने मदत करतो, परंतु काही लोक जे बोलतात तसे वागत नाहीत.

काही लोक पैसे घेताना चांगले वागतात, मुदत मागून गयावया करतात पण परत करायच्या वेळी टाळाटाळ करतात काही जण तर गायब होतात. मग अशा वेळी माणूस मोठ्या संकटात सापडलेला असतो कारण जोर-जबरदस्तने पैसा मागितले की नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

मित्रांनो त्यासाठी उधार दिलेले पैसे आपल्याला काही दिवसातच मिळतील, यासाठी एक जालीम उपाय करायची गरज आहे. आपण एखाद्याला त्याच्या संकटाच्या वेळी पैसे उधार देतो, परंतु जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती 100 कारणे सांगते. यामुळे मानसिक तणा व सहन करावा लागतो.

पैसा तर परत मिळत नाही पण उलट नातेसंबंध खराब होतात, अशा वेळी अनेक प्रयत्न करून देखील समोरची व्यक्ती तुमचे घेतलेले पैसे परत करत नसेल तर हा उपाय केल्यास या उपायामुळे तुमचे पैसे ती व्यक्ती स्वतःहुन देईल.

मित्रांनो आपल्याला हा उपाय गोपीचंदनाचा करायचा आहे. कारण तो खूप परिणामकारक ठरतो. तसेच हा प्रयोग प्रदोषव्रत ज्या दिवशी असते त्याच दिवशी केल्यास अधिक चांगल्या पद्धतीने प्रभावी ठरतो. तुम्ही फक्त तीन ते चार प्रदोष करा आणि याचा तुम्हाला प्रभाव नक्कीच दिसेल.

हा उपाय स्कंदपुराणात सांगितला आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल. तसेच प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्यातून दोन वेळा येत असते. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते.

मित्रांनो सर्वात आधी हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलपत्र गरजेचे आहे. हे बेलपत्र  प्रामुख्याने 3 पानाचे असावे. आपल्याला यामध्ये मध्य भागातील पानाचा वापर करायचा आहे. या बेलपत्राच्या जे मध्यभागी पान असते त्या पानावर गोपी चंदनाचा लेप लावायचा आहे.

आपल्याला हे गोपी चंदन लावलेल्या बेलपत्राचे पान उजव्या तळहातावर मध्यभागी ठेवायचं आहे. आपल्या मनातल्या मनात आपले उधार घेतलेले पैसे त्या लोकांनी लवकर परत करावेत अशी इच्छा व्यक्त करून, तळहातावर घेतलेल बेलपत्र शिवलिंगावर चिकटवायचे आहे.

मित्रांनो त्यानंतर एक तांब्या जल त्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. कारण महादेव हे या सृष्टीचे पालनकर्ता आहेत. शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा सतत जप करायचा आहे.

आपल्याला फक्त तीन ते चार प्रदोष हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याचा प्रभावी परिणाम नक्कीच जाणवेल. तुम्हाला नक्कीच सकारात्मक उर्जा जाणवेल. तुम्ही उधार दिलेले पैसे नक्कीच परत मिळतील ती व्यक्ती स्वतःहुन  पैसे तुमच्याकडे आणून देईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here