नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो व्यवसायात मंदी, नोकरीत अपयश व जीवनात निराशा प्रत्येकाच्या जीवनात येत जात राहते. आणि त्यामुळे तुम्ही सतत चिंतीत व अस्व स्थ राहता, म्हणून हा एक उपाय केल्यास तुमच्या जीवनात असणाऱ्या समस्या निघून जातील. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी व पुन्हा घरात प्रवेश करू नये यासाठी आपण तुरटीचा खडा वापरतो. कारण आपले शास्त्र सांगते, तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण करण्याची क्षमता असते.
मित्रांनो घरातील या ठिकाणी हा तुरटीचा खडा ठेवला की आपल्या अडचणी दूर होतील. यामुळे आपल्या घरातील सकारात्मक लहरी वाढतात आणि त्यामुळे घरात वाद होत नाहीत. घरामध्ये या विशिष्ट जागेवर तुरटीचा खडा ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. मित्रांनो तुरटीला प्राचीन शास्त्रांमध्ये खूपच महत्व प्राप्त आहे आणि अनेक शास्त्रांमध्ये तुरटीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आहे.
तुरटीचा वापर धन प्राप्ती करण्यासाठी सुद्धा केला जातो. कारण तुरटी आपल्या अडचणी, बाधा दूर करते ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. मित्रांनो तुमच्या घरामध्ये जितक्या खोल्या आहेत, त्या प्रत्येक खोलीमध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे. तसेच घरातील टॉ यलेट बाथरू म मध्ये देखील एक एक तुरटीचा तुकडा ठेवा.
मित्रांनो त्यासाठी काचेचा बाउल वापरायचा आहे, त्याच बरोबर तुमचे जर दुकान असेल, तुम्ही जिथे जॉ ब करता ते ऑफिस अशा ठिकाणी हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणचे मुख्य प्रवेशद्वार जे असेल तिथे हा तुकडा बांधा. त्याच सोबत आपल्या घराचे जे प्रवेश द्वार आहे, तेथे काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटीचा खडा बांधून दरवाज्याजवळ लावायचा आहे आणि तो प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बांधायचा आहे.
मित्रांनो असं केल्याने घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती निघून जाते. घरातील वास्तुदोष निघून जातात. नकारात्मक ऊर्जेमुळे घरामध्ये पैसा येत नाही. घरातील वातावरण चांगले राहत नाही या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला तुरटी काळ्या कपड्यात बांधून दरवाजाजवळ लावायची आहे.
असं केल्याने लवकरच तुम्हाला धनप्राप्तीचा लाभ होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल. तसेच अजून एक उपाय आहे, जो आपल्याला सलग 3 बुधवारी करायचा आहे, त्यासाठी खायचं पान म्हणजेच नागिणीचे पान घ्या. त्या पानावर थोडं कुंकू टाकून एक तुरटीचा खडा त्यावर ठेवून ते गुंडाळा व ते पान ताबडतोब पिंपळाच्या झाडाखाली एक मोठ्या दगडाखाली ठेवून या.
असं केल्याने तुमच्या अडचणी दूर होतील, क र्ज लवकर फिटेल. आयुर्वेदिक शास्त्रा सोबतच तुरटीला ज्योतिषशास्त्र, तं त्र मं त्र , वास्तुशास्त्रात प्राचीन काळापासून स्थान आहे. वरीलप्रमाणे तुम्ही जर तुरटीचा खडा पूर्ण श्रद्धेने वापरला तर त्याचा लाभ फक्त तुम्हाला नव्हे तर घरातील सर्वांना होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.