नमस्कार मित्रांनो,
मित्रानो दातांची समस्या खूपच सामाईक आहे. आपण नेहमीच दात पांढरे शुभ्र दिसण्यासाठी घरगुती उपाय करत असतो. तसेच प्रत्येकाला कधी ना कधीतरी दाताच दुखणं झालेलं असणारचं, पण हे दुखणं काय आहे हे दातदुखी झालेल्या माणसाला नक्कीच कळेल.
वास्तविक दातांच्या आसपासच्या नसांमध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागली किंवा त्रास होऊ लागला की, दातदुखीला सुरुवात होते. काही लोकांना दात दुखीचा त्रास इथपर्यंत होतो की, त्यांच्या कानात आणि डोक्याची नस दुखते.
दातदुखी आणि दाढदुखी हे दोन्ही असाह्य असते. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की, ते जबड्यापर्यंत पोहोचते. यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर सूज येते. आणि या परिस्थितीत जेवण ग्रहण करणे शक्यच नसतं.
आजूबाजूला असणारे लोक अशावेळी सल्ले देत असतात, घरगुती उपाय करायला सांगत असतात. त्यामुळे दातदुखीपासून सुटका मिळवायची असेल तर घरगुती उपाय काय आहेत याबद्दल माहिती घेऊया.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारा घटक म्हणजे तुरीच्या झाडाची पाने (तूरडाळ). हा उपाय आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहिला म्हणजे या झाडाची पाने घ्या. त्याची गोळी बनवा आणि आपल्या दाताखाली धरून ठेवा.
साधारणतः 10 ते 15 मिनिटात तुमची दात दुखी कमी होईल आणि त्यातील कीड असेल ती मरेल. दुसरी पद्धत म्हणजे या झाडाची पाच ते सहा पाने घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या.
त्या पाण्यामध्ये पानांचा अर्क उतरेल आणि या काढ्याने दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी गुळण्या करायच्या आहेत. या पद्धतीने तुम्ही जर तुरीच्या पानांचा उपयोग केला तर नक्कीच तुमची दात दुखी कमी होईल व कीड निघून जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.