नमस्कार मित्रांनो,
तुळशी वृंदावन हे घरात असल्यास नकारात्मक विचार व गोष्टी नाहिशा होतात. त्याने घराच्या परिसरात स्वच्छ हवा राहण्यास मदत होते, पण घरात या दिशेला तुळस लावल्याने अधिक लाभदायक असते.
मित्रांनो तुळशीचे महत्त्व गरुड पुराणात पण सांगितले आहे. आयुर्वेदिक तुळशीला संजीवनी म्हणतात, त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानामध्येही तिचा स्वीकार झाला आहे.
तुळशी मुळे आपल्या घरातले वास्तुदोष नाहीसे होतात आणि आर्थिक परिस्थिती बदलते. आपल्या हिंदु धर्मात तुळशीला माता मानले जाते.
मित्रांनो हे तुळशी वृंदावन लावण्याची पहिली योग्य दिशा ही उत्तर आहे. कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची मानली जाते. त्यामुळे आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बदलेल.
जर तुम्हाला उत्तर दिशेला तुळस लावणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेला तुळशी वृंदावन करू शकता. तसेच पुर्व आणि उत्तर या मधील दिशा म्हणजे ईशान्य दिशेलाही तुळस लावणे योग्य मानले जाते.
मित्रांनो या तीन दिशा तुळस लावण्यास योग्य आहेत. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप लावायचे असतील तर त्या विषम संख्येत लावाव्यात. उदा.1, 3, 5, 7 आणि 9 या संख्येत लावावे.
तुळशीमध्ये दोन प्रकार पडतात पहिली राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस असे प्रकार पडतात. या दोन्हीही तुळशी आपल्यासाठी चांगल्याच आहेत.
मित्रांनो जेव्हा तुमचे तुळशीचे रोप सुकते तेव्हा ते तुम्हाला सावध करत असते की तुमच्या घरावर काहीतरी संकट येणार आहे.
जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना जर एक तुळशीचे पान तोंडात टाकले तर ते काम यशस्वी होण्यासाठी मदत होईल.
मित्रांनो जर विनाकारण तुमचा पैसा खर्च होत असेल तर नेहमी तुमच्या पाकीटात तुळशीचे एक पान ठेवावे. ज्या लोकांचा उद्योग आहे त्यांनी तुळशीला 3 दिवस पाण्यामध्ये ठेवावे. त्यानंतर हे पाणी आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिंपडावे. तुमचा व्यवसाय जोमाने चालेल.
मित्रांनो रविवारी, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. काहीजण ही तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करतात पण ही पाने अर्पण करताना पालथी घालावी.
आपण श्रीराम आणि भगवान हनुमान यांना ही तुळशीची पाने अर्पण करू शकता. पण शिवलिंगाला, माता दुर्गा आणि भगवान श्रीगणेश यांना तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नये.
मित्रांनो तुळशी वृंदावन लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुवार. आपण दररोज सकाळी माता तुळशीला जल अर्पण करावे पण रविवारी मात्र तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी सायंकाळी तुळशीपुढे दिवाही लावू नये.
माता तुळशीसमोर बसून,
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी,
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते
हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर आणखी एका मंत्राचा आपण उच्चार करू शकता. तो मंत्र आहे.
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
या मंत्राच्या उच्चाराने घरात कोणालाही अकाल मृ त्यु येत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.