मित्रांनो प्रत्येकाच्या घरी तुळशीचे वृंदावन जरूर असते किंवा तुळशीचे छोटेसे रोपटे तर नक्कीच असते. तुमच्याही घरामध्ये तुळशी असेलच. तर मित्रांनो खास करून जी घराबाहेर तुळशी असते त्या तुळशीला तुम्हाला एक वस्तू बांधायची आहे.
ज्याने आपल्या घरावर जी संकटे येतील ती त्या वस्तूमुळे आणि तुळशीमुळे येणार नाहीत. कधीच कोणते संकट हि वस्तू घरावर येऊ देणार नाही. मित्रानो तुळशी वृंदावन हे दोन कामे करत असते.
एक म्हणजे आपल्या घराचे सौभाग्य समृद्धी दर्शवित असते. ज्या घराच्या बाहेर तुळशी बहरलेली असते त्या घरात समाधान असते, समृद्धी असते. ज्या घराबाहेर तुळशी सुकलेली, वाळलेली असते त्या घरात सुख समृद्धी नसते, बरकत नसते अशी मान्यता आहे.
असे सांगितले जाते कि आपली तुळशी नेहमी टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुळशी छोटीशी असली तरी ती टवटवीत असावी. तर मित्रानो तुम्हाला हि जी एक वस्तू आहे ती तुळशीला बांधायची आहे.
मित्रांनो तुम्हाला एक पूजेचा लाल धागा किंवा लाल दोरा घ्यायचा आहे. एकदम लाल भेटला नाही तरी चालेल रंगीबेरंगी जो आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या पूजेमध्ये हाताला बांधतो तो धागा असला तरी चालेल.
मित्रांनो दुसरा कोणता लाल दोरा असला तरी चालेल. मित्रानो तुम्हाला एक लाल दोरा घ्यायचा आहे आणि तो दोरा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे. हा दोरा तुळशीला कुठे बांधायचा आहे?
मित्रांनो तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल तर त्या वृंदावनालाच हा दोरा बांधायचा आहे. वृंदावन खूपच मोठे असेल तर तुळशीलाच हा दोरा तुम्हाला बांधायचा आहे. जिथून तुळशी उगवली आहे त्या खोडालाच हा दोरा तुम्हाला बांधायचा आहे.
मित्रांनो लक्षात घ्या एकदम वर हा दोरा बांधायचा नाहीये. मातीमधून जिथून तुळशी वर आलेली आहे तिथेच हा लाल दोरा बांधायचा आहे. सिंगल म्हणजे फक्त एक राउंड हा धागा तुम्हाला बांधायचा आहे.
या उपायाने कधीच कोणती वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, कोणी केलेली करणी बाधा काहीही वाईट असुद्या जी तुम्हाला त्रास देऊ शकते जी तुम्हाला अडचणीत टाकू शकते त्यापासून तुमचे रक्षण होणार आहे.
तर मित्रानो नक्कीच हा उपाय तुम्ही करा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या जीवनात नेहमीच सुखाची भरभराट व्हावी हि स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.