नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे छोटेसे का होईना रोपटे असतेच. आपण रोज सकाळ संध्याकाळ तुळशीचे पूजन करतो. तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावून जल अर्पित करतो.
लक्ष्मी मातेचे स्वरूप तुळशीला मानले जाते. पण मित्रांनो चुकून सुद्धा घरात या ठिकाणी तुळस ठेवू नका. नाही तर घरात अडचणी येतात, संकटे उदभवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही जागा सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुळस चुकून सुद्धा ठेवायला नाही पाहिजे.
मित्रांनो तुळस कधीच चुकूनसुद्धा घराच्या छतावर किंवा टेरेस वर ठेवायचे नसते. असं केल्याने आपल्या घरात आर्थिक हानी होते, धन हानी होते. परिणामी आपल्या समस्या वाढू शकतात.
मित्रांनो उत्तर दिशेला सुद्धा तुळस ठेवू नये. असं केल्याने घरावर संकटे येतात. मित्रांनो बऱ्याच लोकांच्या घरात मागचे दार असते तिथे सुद्धा तुळस ठेवू नये. असं केल्याने घरातील व्यक्तींचे आजारी पाडण्याचे प्रमाण वाढते.
मित्रांनो तुळशीचे रोप नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवावे. तुळशी मध्ये जाळे किंवा चिमण्यांचे घरटे असेल तर ते त्वरित दुसरीकडे हलवा. तुळस हि नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असणे जरुरी असते.
तुळशीत कचरा, घाण साठता कामा नये. असे झाल्यास तुमच्या घरात केतूचा वास होतो असे शास्त्र सांगते. मित्रांनो तुळशी ठेवण्याची सर्वोत्तम दिशा म्हणजे पश्चिम दिशा. तुम्ही प्रयत्न करा कि तुमची तुळस हि नेहमी पश्चिम दिशेलाच असावी.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.