या दिशेला लावलेली तुळस फायदा कमी आणि नुकसान जास्त देते. एकदा नक्की बघा.

0
370

नमस्कार मित्रानो

मित्रानो जर आपल्याला घर बांधायचे असेल किंवा घरात काहीही स्थापित करायचे असेल तर वास्तुशास्त्राची विशेष काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

खरं तर आज आपण तुळशी या औषधी गुणांनी भरलेल्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, अशी तुळस जी लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. तुळशी बद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे पालन केले तर तुमच्या घरात सुख-समृद्धी हमखास नांदते.

मित्रानो हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. लोक तुळशीची पूजा करतात, तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात आढळते. तुळशी बुधाचे प्रतिनिधित्व करते जे भगवान श्रीकृष्णाचे एक रूप मानले जाते.

अनेक घरांमध्ये तुळशीची पूजाही केली जाते, परंतु तुळशीला योग्य ठिकाणी न ठेवल्यास त्याचे अशुभ परिणामही मिळतात. घराच्या बाल्कनीमध्ये उत्तर आणि ईशान्य दिशेला तुळशीची पाच रोपे लावावीत. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते.

आजच्या काळात जागेच्या कमतरतेमुळे लोक आपल्या छताच्या वर तुळशीला ठेवतात, परंतु वास्तुनुसार ते योग्य मानले जात नाही, ज्यामुळे तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. तुळशीचे रोप हे औषधी गुणांनी परिपूर्ण असण्यासोबतच श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कोणत्या दिशेला ठेवावे हे जाणून घेतले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे रोप घराच्या बाल्कनी किंवा खिडकीच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. या दिशांना देवी-देवता वास करतात असे मानले जाते आणि या ठिकाणी तुळशीचे रोप ठेवणे शुभ असते.

लक्षात ठेवा की निवडुंग किंवा अन्य काटेरी झाडे कधीही तुळशी सोबत ठेवू नयेत. असे मानले जाते की अमावस्या, द्वादशी आणि चतुर्दशीला तुळशीची पाने चुकूनही तोडू नयेत. रविवारी तुळशीची पूजा केली जात नाही आणि पाणीही अर्पण करत नाहीत. लक्षात ठेवा रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत.

तुळशीचे रोप कधीही नखाने तोडू नये असे , हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. जर तुळशीचे रोप सुकले असेल तर ते जास्त काळ घरात ठेवू नये कारण यामुळे नकारात्मकता घरात पसरते. तुळशीचे रोप सुकले असेल तर कुंडीतून काढून नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.

पूजेच्या वेळी देवी-देवतांना तुळशीची पाने अर्पण केल्यास शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे. लक्षात ठेवा गणपतीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा समावेश करू नये. घराच्या अंगणाव्यतिरिक्त स्वयंपाकघरात देखील तुळशीचे रोप लावता येते. मान्यतेनुसार तुळशीला स्वयंपाकघरात लावल्याने कुटुंबातील कलह आणि क्लेश दूर होतात.

तुळशीचे रोप घरामध्ये उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तूनुसार तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. याचा घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होत असेल तर नैऋत्य कोपऱ्यात तुळशी ठेवा आणि दर शुक्रवारी सकाळी कच्चे दूध अर्पण करा.

सोबतच एखाद्या विवाहित स्त्रीला मिठाई भेट द्या. त्यामुळे व्यवसायात फायदा होईल. जर तुम्हाला लग्नात अडचण येत असेल तर तुळशीला अग्नीच्या कोनात ठेवा आणि रोज पाणी अर्पण करा, यामुळे तुमचे लग्न लवकर होण्यास मदत होईल.

तुळशीचे रोप पूर्वाभिमुख खिडकीजवळ ठेवल्याने मुले हट्टी असतील तर त्यांचा हट्टीपणा थांबतो. तुळस घराच्या अंगणाच्या मध्यभागी लावली तर त्याचे अंत्यंत शुभ आणि सकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होत असतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here