तूळ रास – आज अक्षय तृतीया सुर्य करणार राशी परिवर्तन तुळ राशीसाठी अतिशय आनंदाची बातमी…

0
363

नमस्कार मित्रांनो,

वैशाख पक्षातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते. आज वैशाख शुक्ल पक्ष मृग नक्षत्र दिनांक 14 मे रोजी शुक्रवार लागत असून अक्षय तृतीया आहे.

शास्त्रानुसार हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आलेला आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष अनुष्ठान केले जातात. मान्यता आहे कि या दिवशी माता लक्ष्मी अतिशीघ्र प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानण्यात आले आहे. हा दिवस सोने अथवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानण्यात आला आहे. संपूर्ण साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेला प्रमुख स्थान प्राप्त आहे.

यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवारी असून पंचांगानुसार आज ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून ते मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करणार आहेत. आज दिनांक 14 मे रोजी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

15 जून पर्यंत ते याच राशीत राहणार असून त्या नंतर ते मिथुन राशीत गोचर करतील. मित्रांनो भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे दाता असून मान सन्मान आणि पदप्रतिष्टेचे कारक मानले जातात.

जेव्हा सूर्याची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय शुभ बनत असून अनेक वर्षानंतर हा योग जमून येत आहे.

या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे भाग्य चमकणार असून यांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. अक्षय तृतीयेचा शुभ प्रभाव आणि सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

अक्षय तृतीयेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आता आपल्या जीवनाती दुःख आणि दारिद्र्याचा अंत होणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.

उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता समाप्त होणार असून घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.

आता आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. या काळात सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या ऊर्जेमध्ये वाढ होणार असून धन प्राप्ती बरोबरच मान सन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे.

येणारा काळ तुमच्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा पुरेपूर वापर करून यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.

माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.

उद्योग, व्यापार आणि व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत असून घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत.

माता लक्ष्मीचा वरद हस्त आपल्या पाठीशी राहणार असून गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या मनाला प्रसन्नता प्रदान करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here