नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदू धर्मानुसार प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला होता.
मान्यता आहे कि भगवान बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत. शास्त्रानुसार बुद्धपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी अथवा कुंडामध्ये स्नान करणे विशेष लाभकारी मानले जात असून दान पुण्य करणे विशेष फलदायी मानले जाते.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिलेलं दान हे विशेष लाभकारी मानण्यात आले आहे. या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 10 वाजून 52 मिनिटांपर्यंत शिवयोग राहणार असून त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग सुरु होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी सर्वार्थ सिद्धी योगाला अतिशय शुभ मुहूर्त मानण्यात आले आहे. मान्यता आहे कि या शुभ संयोगाच्या वेळी केलेले कोणतेही काम सफल बनते.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत तर सूर्य वृषभ राशीत विराजमान असतील. दिनांक 25 मे रोजी रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 26 मे रोजी दुपारी 4 वाजून 44 मिनिटानी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
विशेष म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्र ग्रहण या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, जपान, सिंगापूर, बांग्लादेश, हिंदी महासागर इत्यादी ठिकाणी दिसणार असून भारतात मात्र हे उपछाया चंद्रग्रहण असणार आहे.
त्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळण्याचे काही कारण नाही. बुद्ध पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण अनुराधा नक्षत्रावर वृश्चिक राशीवर होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण दिसो अथवा न दिसो त्याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो.
दिनांक 26 मे बुधवार रोजी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी ग्रहणाला सुरवात होणार असून 4 वाजून 50 मिनिटांनी ग्रहण मध्य तर 6 वाजून 24 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे.
या ग्रहणाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून काही राशींसाठी हे चंद्रग्रहण अशुभ ठरणार असले तरी या तूळ राशीसाठी मात्र हे चंद्रग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे.
बुद्ध पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा शुभ संयोग आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरणार असून आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.
इथूनच पुढचा काळ आपला भागोद्य घडून आणणार काळ ठरणार असून आपले मनोरथ पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार असून प्रत्येक वळणावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्यात यशस्वी व्हाल.
घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली स्वप्ने या काळात पूर्ण होणार आहेत.
मित्रांनो अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक आणि इतर पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.