घराच्या पश्चिम दिशेला हे झाड असल्यास होईल धनलाभ… लक्ष्मीचा राहतो कायम वास…

0
304

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान हवे असते आणि आजच्या युगात यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे पैसा. पैसा कमावणे कठीण तर असतेच पण त्यापेक्षा कठीण असते घरातील पैसा टिकवून ठेवणे.

मित्रानो आपण इतक्या कष्टाने, मेहनतीने पैसे कमावतो आणि जर हे पैसे घरातील व्यक्तींच्या आजारपणात किंवा अनावश्यक गोष्टींत जर खर्च होत असतील तर आपल्या घरात सतत दारिद्य आणि गरिबी राहते.

आजारपणावर पैसा खर्च होऊन नये आणि आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये अशी काही झाड सांगितली गेली आहेत कि जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात. जर हि झाडे आपल्या घराच्या आजूबाजूला लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो.

हि झाड म्हणजे तुळस, वटवृक्ष आणि पिंपळ. मित्रांनो पिंपळाच्या झाडाला शास्त्रामध्ये खूप महत्वाचा स्थान दिले गेले आहे. या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री भगवान विष्णू विराजमान असतात. सोबतच पिंपळाचे झाड हे 24 तास ऑ क्सि जन देत असते.

तर अशा या मनुष्यासाठी वरदान असलेल्या पिंपळाच्या झाडाचाच एक उपाय आपण पाहणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये वास्तू दोष असेल आणि त्यामुळे जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, किंवा आजारी व्यक्तीवर पैसा खर्च होत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा.

यासाठी आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल चढवायचं आहे. एका तांब्यात पाणी घेऊन ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. धूप, अगरबत्ती लावून पिंपळाची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर 5, 7 किंवा 11 अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत.

मित्रांनो प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जाप करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे आजारपण दुर होईल सोबतच तुमच्या घरातील वास्तू दोष देखील दूर होईल.

तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील तर ते देखील दूर होतील. मित्रांनो जर आपल्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाच झाड असेल तर हे आपल्यासाठी एक खूप मोठं वरदान आहे असे समजावे.

जर तुम्हाला शक्य असल्यास तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड अवश्य लावा. आणखी एक गोष्ट म्हणजे याच दिशेला निलगिरीचे झाड असेल तर हे अत्यंत घातक आहे. निलगिरीचे झाड आपली जीवनीशक्ती शोषित करून घेते.

तुम्ही आजवर पाहिले असेल कि निलगिरीच्या झाडावर कोणत्याही पक्षाचं घरट नसत आणि त्याच्या खोडाच्या इथे सुद्धा कोणत्याही जीवाचं बीळ नसत. तर मित्रांनो घराच्या पश्चिमेला निलगिरीचे झाड असेल तर ते ताबडतोब काढून त्या ठिकाणी पिंपळाचे झाड अवश्य लावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here