नमस्कार मित्रांनो,
आज दिनांक 16 फेब्रुवारी 2021. जाणून घेऊया आजचे 12 राशींचे भविष्य. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? चला तर मग जाणून घेऊ.
मेष रास
कार्यक्षेत्रात जपून पाऊल टाका बदनामी होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी नोकरी किंवा व्यवसायात यश प्राप्त होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवायचा प्रयत्न करा. आज जुने मित्र मैत्रिणी भेटतील.
घरातल्या कामासाठी वेळ काढावा लागेल. आर्थिक स्थितीत सुधार यावा यासाठी रोज हनुमानाची मनोभावे पूजा करावी. संध्याकाळी जोडीदारासाठी काहीतरी खास प्लान करा. शुभ रंग – मोरपंखी
वृषभ रास
आरोगयाची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचे मत न जुळल्यामुळे खटके उडू शकतात.वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे.कामाचा कंटाळा आज तुम्हाला येईल. आराम करायची सारखी इच्छा होईल.
जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.गरीबांना अन्न दान करा.व्यावसायिक जीवनात प्रगती व्हावी यासाठी घरातील महिलेला गाईची चांदीची मूर्ती दान करावी. शुभ रंग – पोपटी
मिथुन रास
कष्ट करण्याची तुमची खूप इच्छा असली तरी कामाचा त्रास आज जाणवेल. इतर कोणी मदतीचा हात तुमच्याकडे मागून तुम्हाला फसवू शकतो.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. सामाजिक जीवनात थोडेफार अडथळे निर्माण होतील. बँकेत काम करणाऱ्या व्यक्ती दिलेल्या कमला पुरून उरतील. शुभ रंग – राखाडी
कर्क रास
मज्जा मस्ती करण्यात आजचा दिवस घालवाल. राजकारणातील लोकांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते. तुमचे काम बघून कुटुंबातील व्यक्ती तुमची प्रशंसा करतील.
भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. तिसरा व्यक्ती तुमच्या जवळच्या लोकांसोबत भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल. शुभ रंग – लाल.
सिंह रास
व्यवसाय करणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. मिळालेल्या संधीचे सोने करायचा प्रयन्त करा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांसोबत घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात.
आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो.आज तुमचा मूड ऑफ असल्यामुळे घरातील जोडीदारावर राग निघू शकतो. शुभ रंग – पांढरा.
कन्या रास
आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.नोकर वर्गाला कामे करताना अडथळे येण्याचे संकेत आहेत. वायफळ खर्चावर नियंत्रन ठेवावे.
तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. आजचा दिवस शक्यतो एकटे घालवण्यात तुमचे हीत आहे. शुभ रंग – भगवा.
तुळ रास
धनलाभ होण्याची आज दाट शक्यता आहे. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
तुमच्या भावनांना आवर घाला नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात काड्या करू शकतात त्यासाठी सावध राहावे. शुभ रंग – पिवळा.
वृश्चिक रास
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात षटकार मारण्याची चांगली संधी आहे. वैवाहिक आयुष्यात सुख प्राप्त होईल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल.
तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल. शुभ रंग – हिरवा
धनु रास
आजचा दिवस कामात खूपच बीजी असणार आहे तरी अधून मधून आराम करा. बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती दिलेलं काम पूर्ण करतील. अतिशय क्षुल्लक कारणांवरून प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील.
तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत कराल. शुभ रंग – निळा.
मकर रास
राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.
आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. शुभ रंग – जांभळा
कुंभ रास
आजच्या दिवशी आरोगयाची काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. मित्र परिवारासोबत भांडणे होऊन मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे शांत चित्तेने घ्यावे.
आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदीत व्हाल.अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. शुभ रंग – तांबडा
मीन रास
नोकरीत बढती मिळण्याचे संकेत आज आहेत. आजचा दिवस थोडा तणावात जाईल तरी प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते.
तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी कळणार आहे. गरीबांना दानधर्म करा. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग – गुलाबी
असंच 12 राशींचे रोजचे भविष्य वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज नक्की लाइक करा.