नमस्कार मित्रानो,
तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे.
मित्रानो जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर होय. हे मंदिर जेवढे भव्य, दिव्य आणि श्रीमंत आहे तसेच येथील आजूबाजूच्या परिसरात सुद्धा भरभराट पहावयास मिळते. दरवर्षी भक्तांनी केलेले दान पूर्ण जगभर चर्चेत असत.
काही बालाजी भक्त दानपेटीत नोटांची बंडले टाकतात तर काही जण सोन्याच्या विटा, दागिने इत्यादी निनावी स्वरूपात दानपेटीत टाकत असतात. मित्रानो तुम्हाला माहीतच असेल तर तिरुपती बालाजी येथे डोक्याचं मुंडन करून ते केस बालाजीला अर्पण करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे.
येथे केस दान केल्याने मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री असो वा पुरुष स्वइच्छेने केस दान करतात.रोजच्या रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. अक्षरशः भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचा खच या ठिकाणी पडलेला असतो.
दरवर्षी जवजवळ एक कोटी भक्त आपले केस येथे दान करत असतात. मित्रानो गेल्या काही वर्षांत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जेवढे केस दान झाले त्या केसांचा लिलाव जेव्हा झाला तेव्हा या मंदिराला तब्ब्ल 12 कोटी रुपये मिळाले.
मित्रानो या विकलेल्या केसांचे कृत्रिम केस बनवले जातात. या केसांना विदेशात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. या केसांचा विग आणि केस लांब दिसावे म्हणून वापर सरास केला जातो.
या मंदिराचे चेयरमन चांदलवाडा कृष्णमूर्ती यांनी सांगितले कि केसांचा लिलाव झाल्यावर जी रक्कम येते त्याचे दूध विकत घेण्यात येते आणि त्याच दुधाचा वापर प्रसाद आणि लहान मुलांमध्ये वाटण्यात होतो.
ज्या ठिकाणी भक्त आपले केस दान करतात त्या ठिकाणाला कल्याण कट्टा असे संबोधले जाते. जो न्हावी आपले मुंडन करतो त्याला वेगळे पैसे देण्याची गरज पडत नाही. जर कोणी त्यांना स्वखुशीने पैसे देण्याचा प्रयत्न केला तर ते न्हावी ते पैसे स्वीकारत नाहीत. कारण त्यांना देवस्थानातून पगार भेटत असतो.
मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.