नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आजकाल स्त्रियांसाठी खूप काही करुन सुद्धा त्या खुश होत नाहीत. पुरुष दिवस रात्र काम करून स्त्रियांना जे हवं ते पुरवण्याचा प्रयत्न करतात. पण एवढं करुन सुद्धा स्त्रिया खुश होत नाहीत.
एवढं करून सुद्धा जर ती स्त्री खुश होत नसेल तर त्या पुरुषाने काय केलं पाहिजे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सर्वात आधी सर्व पुरुषांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. पुरुषांना स्त्री ला खुश ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे जरी खरं असलं तरी तिने खुश राहावं किंवा नाही हे सर्वस्वी तिच्यावर अवलंबून आहे.
जेव्हा एखादा पुरुष स्त्री च्या सुखाची वाजवीपेक्षा जास्त जबाबदारी घेत असतो आणि जर तो तिला सुख देण्यात यशस्वी झाला नाही तर ते त्याला त्याचं अपयश वाटतं.
मित्रांनो पुरूषांनी स्त्रीच्या सुख किंवा आनंदाबद्दल स्वतःला जबाबदार मानलं नाही पाहिजे. समजूतदार पुरुषांना हे माहीत असतं की स्त्रिया जे काही वाटतं त्याला सर्वस्वी तीच जबाबदार आहे. फक्त जर स्त्री दुःखात असेल तर मात्र त्याची जबाबदारी पुरुषांची असते.
जास्तीत जास्त प्रयत्न करून स्त्रियांना खुश ठेवणं आणि प्रयत्न करून देखील ती खुश झाली नाही हे पाहण्याची तुमची गरज असते. मित्रांनो या दोन गोष्टीत खूप मोठी तफावत आहे.
स्त्रीला सुख द्यायचं असेल तर ती जेव्हा दुखी असते तेव्हा फक्त सहानुभूतीने वागण्याची गरज असते. स्त्री जेव्हा दुःखात असते तेव्हा तिच्या दुःखात सामील होणारा पुरुष तिला हवा असतो.
स्त्रिया दुःखात असताना त्यांना वाटतं की आता त्यांना जे हवं आहे ते पुरुषांना जाणवलं पाहिजे. मला आता काय वाटत आहे हे पुरुषाने मनातून ओळखावं अशी त्यांना इच्छा असते.
स्त्रियांना सुख द्यायचं असेल तर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तिला बाहेर फिरायला घेऊन गेलं पाहिजे. तिच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे जसं की समुद्र किनारी, बागेत अशा ठिकाणी घेऊन जाऊन आपलं तिच्या वर किती प्रेम आहे हे व्यक्त केलं पाहिजे.
वेळोवेळी आपलं तिच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. भौतिक गोष्टी, महागड्या वस्तू देऊन जर स्त्रिया खुश होत नसतील तर त्यांना भरपूर प्रेम देऊन खुश करणं ही प्रत्येक पुरुषांची जबाबदारी असते.
बहुतेक जण म्हणतात की त्यांना बाहेर घेऊन जाऊन, गजरा देऊन, बाहेर जेवायला घेऊन जाऊन सुद्धा त्या खुश नसतात.
मित्रांनो काही वेळी स्त्रियांना आधाराची गरज असते. त्यांना तुमच्या सोबतीची गरज असते. तुमच्या प्रेमाची गरज असते. जेव्हा त्यांना एकटं वाटत तेव्हा आपल्याला त्यांच्या सोबत राहील पाहिजे.
मित्रांनो अगदी छोट्या गोष्टी आहेत. या तुमच्या जोडीदाराला सुख देताना तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतील.
अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.