नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घर म्हणलं की वादवि वाद आलाच. पण हा वाद जर दररोज विनाकारण होत असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. त्याने घरात अचानक काही ना काही संकटे येऊ लागतात.
घरात वाद असतील तर आपली आर्थिक परिस्थिती खालावते. काय करावे समजत नाही, जर आपल्या घरात अशा समस्या निर्माण झाल्या असतील, तर याचे कारण घरातील काही वस्तू असू शकतात.
मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मकरित्या परिणाम होत असतो.
घरातील प्रत्येक वस्तुमध्ये तिची स्वतःची ठराविक ऊर्जा सामावलेली असते.
या ऊर्जेचा आपल्या जीवनात परिणाम होतो. मित्रांनो यामध्ये घरात काच तु ट ले ली किंवा फु टले ली तिजोरी ठेवल्यास आपल्या घरात दारिद्र्य येते. पैसा घरात राहत नाही. पैसा पाण्यासारखा खर्च होतो.
मित्रांनो त्याच बरोबर फाटलेली पर्स आपल्या जवळ ठेऊ नये. तसेच तिजोरीत खराब वस्तू ठेऊ नये. आपल्या पर्समध्ये देवाचे फोटो ठेऊ शकतो पण बिनकामाची कागदे , रिकाम्या चिठ्या हे सगळे जर ठेवत असाल तर त्वरित बंद करा.
घरात किंवा देव्हाऱ्यात देवीदेवतांची खंडित किंवा तु ट लेले फोटो ठेऊ नयेत. याने आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून त्यांना नदीच्या प्रवाहात सोडून द्या.
मित्रांनो घरामध्ये भंगार किंवा इतर पसारा ठेवल्याने प्रगतीत अडथळा निर्माण होतो. ज्या गोष्टीची घरात गरज नाही त्या गोष्टी घरात ठेऊ नये.
आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ही 3 महिन्यातुन एकदा तरी स्वच्छ करावी. आपल्या छतावर पडलेले भंगार हे दारिद्र्य घरात येण्यास कारणीभूत ठरते. याने पितृदोष होतो.
जुने किंवा वापरात नसलेले कपडे घरात ठेऊ नये. नाहीतर घरात नकारात्मक विचार सुरू होतात. घरात नटराजाचे चित्र, बुडते जहाज, महाभारतातील युद्धाचे चित्र, जंगली पशु आणि काटेरी झुडपे यांची चित्रे घरात कधीच लावू नये. याने मनात नकारात्मक विचार निर्माण होतात.
मित्रांनो महाभारताच्या चित्रामुळे घरात भांडणे होतात, ताजमहाल ही एक कबर आहे. बुडते जहाजाचे चित्र घरातील पैसा खर्च करते. तसेच जंगली जनावरांच्या चित्राने तुमचा स्वभाव ही तसाच बनतो आणि काटेरी झाडांच्या चित्राने जीवनात काटे निर्माण होतात. त्यामुळे अशी चित्रं घरात लावणं टाळा.
घरातील काही वस्तूंमुळे फायदा होत आहे की तोटा हे समजत नसेल तर या वस्तू घरातून बाहेर काढायला हव्या.
मित्रांनो सध्या प्ला स्टि कची फॅशन वाढत आहे. याने नकारात्मकता वाढते आणि प्ला स्टि क हे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे या वस्तु घरातुन बाहेर काढा.
आपल्या घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर ते लगेच काढावेत नाही तर घर पुर्ण जाळीत फसते. अनेक लोकांना वाटते की ते जाळे तोडणे म्हणजे घर तोडणे. पण तसे नसून जाळे जळमटे वेळच्या वेळी काढा.
देवपूजा झाल्यावर घरात निर्माल्य ठेऊ नये कारण त्याने आपल्याला अशुभ फळे प्राप्त होतात. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्ही लिंबु-मिरची लावत असाल तर ते प्रत्येक आठवड्यात ते बदलत रहा.
मित्रांनो या काही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या आयुष्यात असणाऱ्या समस्या कमी होण्यास नक्की मदत मिळते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.