नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे सध्याच्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये घशामध्ये जे इन्फेक्शन, फुफ्फुसात इन्फेक्शन जे होत आहे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे.
हा उपाय करण्यासाठी घरातीलच पदार्थ वापरणार आहोत. यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो घटक म्हणजे सुंठीचे चूर्ण. मित्रांनो सुंठी वाचून खोकला जात नाही हे आपणा सर्वांना माहीतच असेल.
सुंठी मध्ये अँटिबायोटिक गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात असतात. सुंठीचे चूर्ण तयार करण्यासाठी सुंठ खलबत्या मध्ये कुटून घ्यावी व त्यानंतर मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावी.
त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने ती पावडर गाळून घ्यावी. असे हे सुंठीचे चूर्ण चार चमचे आपल्याला घ्यायचे आहे. यानंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे हळद. हळद हि आयुर्वेदात अँटिबायोटिक म्हणून ओळखली जाते.
हळद सुद्धा आपल्याला या उपायासाठी चार चमचे घ्यायची आहे. यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे काळ्या मिरीचे चूर्ण. काळी मिरी हि अँटिबायोटिक गुणधर्मांनी युक्त असते.
तर अशी हि काळी मिरी मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. आणि त्या नंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे. असे हे काळ्या मिरीचे चूर्ण एक चमचा आपल्याला घ्यायचे आहे.
यानंतर चौथा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे इलायची. इलायची मध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी इलायची अत्यंत उपयुक्त असते.
तर अशी हि इलायची आपल्याला चार घ्यायची आहेत आणि त्यातील फक्त दाणे खलबत्या मध्ये बारीक कुटून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे गुळ.
गुळामुळे त्वरित एनर्जी येते तसेच रक्त वाढीसाठी गूळ अत्यंत उपयुक्त असतो. तर असा हा गूळ अर्थ कप किसून घ्यायचा आहे आणि तो मिश्रणात मिक्स करायचा आहे.
यानंतर शेवटचा घटक आपण घेणार आहोत ते म्हणजे साजूक तूप. या गोळ्या बनवण्यासाठी आपल्याला साजूक तुपाचं घ्यायचे आहे. तेल किंवा डालडा वापरू नये. साजूक तुपाचे प्रमाण 2 चमचे घ्यायचे आहे.
आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानतंर त्याच्या हाताच्या साहाय्याने लहान लहान गोळ्या बनवायच्या आहेत. या गोळ्या बनवल्या नंतर हवाबंद बरणीमध्ये सुरक्षित ठेवायच्या आहेत.
या गोळ्या फ्रिज मध्ये ठेवू नयेत. सामान्य तापमानात या गोळ्या 15 दिवस टिकतात. तर अशा या दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा चघळून खायच्या आहेत. आणि गोळ्या चघळून झाल्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ पिऊ नये.
मित्रांनो या गोळ्यांमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे तुमच्या घशामध्ये जर इन्फेक्शन झाले असेल तर ते पूर्णपणे बरे होईल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.