नमस्कार मित्रानो
मित्रानो आयुष्यात प्रत्येकाला श्रीमंत व्हावेसे वाटते. परंतु मित्रानो श्रीमंत व्हायचे असेल तर दिवस रात्र मेहनत करावी लागते , रक्ताचं पाणी करून स्वप्नांच्या मागे धावावे लागते. मित्रानो बरेच लोक आयुष्यात अशा चुका करून बसतात कि मेहनत करून पण ते लोक आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहोत जी कामे कोणीच केली नाही पाहिजेत. अशी कामे केली तर आयुष्यात कधीच सफलता प्राप्त होत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणती आहेत ती कामे.
स्वतःशीच खोटे बोलणारे
मित्रानो असफल होणारे लोक नेहमीच हि चूक करतात कि हे लोक स्वतःशीच खोटं बोलत राहतात. यांना मनापासून वाटत असते कि हे आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे परंतु लगेच यांच्या मनात विचार येतो कि नाही , याची मला सध्या काही गरज नाही.
खरतर यांनी जर ठाम निश्चय केला तर या लोकांना अशक्य असं काहीच नसत परंतु स्वतःवरच यांना विश्वास नसल्यामुळे हे लोक स्वतःचीच समजूत काढत बसतात. जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून मेहनत करा.
मी हे नाही करू शकत
मित्रानो बरेच लोक असे असतात कि कोणतेही कार्य करण्याआधीच मी हे करू शकत नाही बोलून मोकळे होतात. हे लोक स्वतःच स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसतात. मित्रानो जर तुमच्या पुढे एखादी समस्या आली तर तुम्ही आत्मविश्वासाने म्हटले पाहिजे कि मी हे का नाही कर शकणार ?
असा विचार केल्याने त्या कामाप्रती असणारी भीती कमी होते आणि त्या कामाला विविध पद्धतीने कसे करता येईल याचा विचार तुम्ही करू लागाल. परिणामी जे काम तुम्हाला अवघड वाटत होते ते सोप्पे वाटू लागेल.
जळणारे लोक
मित्रानो काही लोक असे असतात कि एखाद्याला जळवायचे म्हणून श्रीमंत होण्याच्या मागे लागलेले असतात. नातेवाईकांमध्ये नाव निघावे म्हणून यांना श्रीमंत व्हायचे असते. एखाद्या सुंदर मुलीला , स्त्रीला मिळवायचं आहे म्हणून श्रीमंत व्हायचं आहे. असे विचार ठेवून लोक कार्य करत असतात.
परंतु मित्रानो खरच आपल्याला अशा विचारांची गरज आहे का ? आयुष्यात सफल व्हायचं असेल तर प्रत्येक कामात स्वार्थ शोधत बसू नका. आपले काम निस्वार्थ भावनेनं आणि पूर्ण निष्ठतेने करायची सवय लावून घ्या.
लक्ष वेधून घेणे
मित्रानो काही लोक असे असतात कि दुसऱ्यांकडून प्रशंसा व्हावी म्हणून काम करत असतात. समोरच्या व्यक्तीने यांच्या कामाची वाह वाह करावी असे यांना सतत वाटत असते. मित्रानो तुम्ही सुद्धा असे करत असाल तर भविष्यात तुम्हाला हि सवय घातक ठरू शकते.
दुसर्यांबद्दल विचार करत बसणं
मित्रानो काही लोक दुसऱ्याचं सुखी आयुष्य बघून निराश होतात. यांना असे वाटते कि आपल्याच आयुष्यात खूप समस्या आहेत , बाकी सर्व खुश आहेत. परंतु मित्रानो लोक तुम्हाला ते दाखवायचा प्रयन्त करतात ते खरतर तस नसत. लोक तुम्हाला बाहेरून सुखी दिसत असली तरी त्यांची सत्य परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहीत नसते.
म्हणून असा विचार कधीच करू नका कि प्रॉब्लम फक्त आपल्याच जीवनात आहे. प्रॉब्लेम सर्वांच्याच आयुष्यात असतात फरक फक्त एवढाच असतो कि त्या प्रॉब्लेमचा सामना तुम्ही कसा करताय.
पैसे खर्च करणे
मित्रानो जो पैसा तुम्ही कमावलाच नाहीये तो पैसा स्वतःच्या सुख सुविधेसाठी कधीच वापरू नका. जर तुम्ही आई वडिलांनी कमावलेल्या पैशांचा वापर योग्य ठिकाणी करत नसाल तर तुम्ही कधीच आयुष्यात सफल होऊ शकणार नाही. जर तुम्हाला तुम्ही हौस मौज पूर्ण करायची असेल तर स्वतः पैसे कसे कमावता येतील याचा विचार करा.
मी आता सेटल आहे
मित्रानो असा कधीच विचार करू नका कि जे काम तुम्ही आज करत असाल ते आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. कारण उद्या कोणीच पाहिलेला नाहीये. कुठल्याही एकाच कामावर किंवा नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग तयार करून ठेवा.
तर मित्रानो तुम्हाला जर आयुष्यात सफल व्हायचं असेल तर या गोष्टींचा अवश्य विचार करा.माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.