नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींवर ग्रहांचा परिणाम हा कमी जास्त प्रमाणात होतच असतो. त्यासाठी आपण त्या त्या ग्रहांना प्रिय धातू वापरतो किंवा परिधान करतो. ज्यामुळे अशा ग्रहांचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो. चांदीची अंगठी बरेच लोक घालतात. चांदी म्हणजे शीतलता, चांदी हा शांत स्वभावाचा धातू आहे. चांदीमध्ये भरपूर शीतलता असण्याचे कारण म्हणजे यावर शुक्र ग्रह आणि चंद्र यांचा प्रभाव असतो.
चांदीची अंगठी जे लोक परिधान करतील त्याच्यावर शुक्र ग्रह व चंद्राच्या शितलतेचा प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच शांत स्वभाव ठेवू शकता. ज्या लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा असतो, ज्यांचा रागावर ताबा राहत नाही अशा लोकांनी चांदीची अंगठी घातल्यास स्वभावात बराच बदल होतो. पण सर्वच राशींनी ही अंगठी परिधान करू नये. कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. पुढील 3 राशीच्या लोकांनी ही चांदीची अंगठी परिधान करू नये.
मित्रांनो पुरातन काळापासून आपल्या देशात अंगठ्या घालण्याची चाल आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅ टि न म, सारख्या मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. चांदीच्या अंगठित शुभ्र मोती बसवून घातल्यास आपला स्वभाव शांत बनतो. चिडचि ड होत नाही.
मित्रांनो या 3 राशींपैकी पहिली राशी म्हणजे मेष राशी, मेष राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नका. या राशीच्या लोकांना चांदीची अंगठी अशुभ मानली जाते. यामुळे त्यांच्या जीवनात विपरीत परिणाम होतात व कुटुंबातील वातावरण तणा वपूर्ण राहते. आयुष्यात कामात खूपच उणिवा भासतात व त्यामुळे चिडचि ड होते. रागावर नियंत्रण राहत नाही म्हणून मेष राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी परिधान करू नये.
दुसरी राशी आहे सिंह राशी. या राशीचा स्वामी सूर्य आहे, ज्यामुळे तुम्ही ही अंगठी परिधान केल्यास तुमच्या जीवनात कलह होतात व तुमचे आयुष्य विनाकारण गुंतागुंतीचे होऊ शकते. तसेच नोकरी, व्यवसायात मोठमोठ्या अडचणी येतात व त्यामुळे अपयश येते. कमजो री वाढते हे सर्व त्रासदायक होऊ नये यासाठी तुम्ही चांदीची अंगठी वापरू नका.
मित्रांनो तिसरी राशी आहे धनु राशी. या राशीच्या लोकांनी जर ही चांदीची अंगठी परिधान केली तर त्यांची धनहानी, मानहानी होते. तसेच घरातील वाद विकोपाला जातात. स्वभाव उ ग्र बनतो म्हणून चुकूनही चांदीची अंगठी वापरू नका.
मित्रांनो ही माहिती ज्योतिष शास्त्रानुसार दिलेली आहे. केवळ उत्सुकता आणि कुतूहल म्हणून या माहितीचा वापर करावा. मराठी धिंगाणा पेज कोणत्याही अं धश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अधिक माहिती साठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा. रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.