देव घरात चुकून सुद्धा अशी घंटी ठेवू नका , घरात भांडणे होतात , परिवारात फूट पडते. वास्तूटिप्स..

0
237

नमस्कार मित्रानो

मित्रानो दररोज आपल्या घरातील देवांची पूजा करणे आपले कर्तव्य असते. सुख आणि दुख आपल्या जीवनाचा अभिन्न हिस्सा आहेत. जर आपण सुखमय शांततेत जीवन व्यतीत करत आहोत तर आपल्याला परमेश्वराचे आभार व्यक्त करणे कर्तव्य आहे.

हे आभार प्रकट करण्यासाठी आपण विधिवत पूजा करतो. म्हणून पूजा पाठ आणि धार्मिक कार्य आपल्या जीवनाचा भाग असतात. विधीवत पूजा करताना जी पूजा सामग्री आपण उपयोगात आणतो आणि पूजा करतेवेळी ज्या वस्तूंचा प्रयोग करतो, जसं की देवाला अंघोळ घालायची भांडी, अंग पुसायचे कापडं, कंकू , अष्टगंध, चंदन लावायचे पात्र, पूजा सामग्री ठेवायची थाळी, प्रसादाचे भांडे शंख किंवा घंटा.. इत्यादी चा उपयोग करण्याचे देखील काही नियम असतात.

या नियमांचे पालन केले तरच आपल्या पूजेला काही अर्थ आणि महत्त्व मिळते. साधारण नेहमीच्या पूजा पाठ करण्याचे विधी नियम आपण सगळे जाणतोच परंतु आज आपण, पूजा करते वेळी कोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवले पाहिजे, कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे आणि पूजा मध्ये वापरली जाणारी घंटी याचे काय महत्त्व असते हे जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट ज्या मूर्तीची तुम्ही पूजा करत आहात त्याला मूर्ती न समजता साक्षात भगवान तुमच्यासमोर आहेत अशी भावना मनात ठेवून तुम्ही पूर्ण विधिवत श्रद्धेने पूजा करावी. वेळेची कमतरता असेल तरीही आठवड्यातून एकदा तरी ईश्वर पूजन तुम्ही केले पाहिजे.

पूजा करण्याआधी देवाचे आवाहन करावे. त्यानंतर आसन, पाद्य, आघ्य, आचमन इत्यादी सर्व क्रिया क्रमाने कराव्यात. हे सर्व करून झाल्यावर शेवटी आरती अवश्य करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार करावा.

पूजा करतेवेळी तुम्ही आसनावर बसूनच पूजा करावी परंतु देवाचे आसन हे तुमच्या आसणापेक्षा उंच असले पाहिजे. दररोज सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावा. नेहमी तेलाचा दिवा उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा.

घरामध्ये शंख , घंटा ठेवण्याची जी जागा आहे त्या जागेची नेहमी काळजी घ्या. शंख नेहमी उजव्या बाजूला तर घंटी डाव्या बाजूला ठेवा. सोबतच कलश नेहमी डाव्या बाजूला ठेवला पाहिजे. कलश मध्ये नेहमी पाणी भरूनच ठेवावे. तांबे, चांदी किंवा सोन्याचा कलश वापरावा अन्य कोणताही नाही.

देवाला कुंकू लावताना नेहमी अनामिकेचा वापर करावा. कारण अंगठ्याचा संबंध आत्म्याशी असतो, तर्जनी चा संबंध पितरांशी असतो तर माध्यमाचा स्वतःची संबंध असतो आणि अनामिकेचा देवतांशी, करंगळीचा संबंध ऋषीशी असतो.

घंटेच्या आवाजातून ध्वनी निघतो. हिंदू धर्मामध्ये ध्वनीचे खूप महत्त्व आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हा ध्वनीनाद झाला होता अशी मान्यता आहे. त्या ध्वनी मधून ॐ ची धुनी होती. घंटेच्या आवाजाला या ध्वनीचे प्रतीक मानले जाते.

मंदिरामध्ये वापरल्या जाणाऱ्याला घंटा म्हणतात आणि घरामध्ये वापरला जाणारीला गरुड घंटी म्हणतात. गरुड भगवान विष्णूचे वाहन आहे. घंटी नेहमी सप्तधातू ने बनलेली असते. घंटी मधून होणार्‍या ध्वनी मधून जे तरंग उठतात ते अत्यंत शुभ मानले जातात. यामुळे आपले चक्र जागृत होतात आणि आपले मस्तक सकारात्मक विचार करू लागते.

स्कंद पुराणानुसार देवांना आंघोळ घालताना, नैवेद्द चढवताना देखील घंटी नाद केला पाहिजे. पूजा करण्याआधी सगळ्यात पहिले घंटी धुवून त्याची पूजा केली पाहिजे. पूजेच्या सुरुवातीला घंटी वाजवली पाहिजे याचा अर्थ असा होतो की, तुम्ही देवतांना आवाहन करत आहात.

तुम्ही त्यांना पुजा स्थळी साक्षात उपस्थित राहण्याचे निमंत्रण देत आहात. धूपदीप करते वेळी देखील घंटानाद करावा. आरती करते वेळी देखील घंटानाद करावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी घंटी नेहमी वाजवली पाहिजे. परंतु हे ध्यानात ठेवा पूजा व्यतिरिक्त कधीही घंटी वाजवू नये. केवळ पूजा मध्येच घंटेचा प्रयोग करावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here