सकाळी उठून दुधाऐवजी या पानाचा चहा करून प्या, वजन हमखास कमी होईल.

0
314

नमस्कार मित्रानो

मित्रानो अनेकांना सकाळी उठल्यावर दुधाचा चहा पिण्याची सवय असते. सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असते. त्याऐवजी तुम्ही तमालपत्र टाकलेला चहा पिऊ शकता. तमालपत्राचा चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तमालपत्रात भरपूर पोषकतत्वे असतात.

यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, सेलेनियम, लोह, तांबे आणि पोटॅशियम गुणधर्म असतात. अशा स्थितीत जर तुम्ही रोज सकाळी तमालपत्राचा चहा पित असाल तर ते अनेक आरोग्यदायी फायदे देते.

मित्रानो चहा बनवण्यासाठी आपल्याला तमालपत्र म्हणजेच तेजपान ३ लागणार आहेत. दोन कप पाणी , चिमूटभर दालचिनी पावडर , एक लिंबू आणि एक चमचा मध लागणार आहे.

आता चहा तयार करण्यासाठी एका टोपात पाणी घ्यायचं आहे आणि ते गॅस वर उकळत ठेवायचं आहे. तेजपान टाकण्या आधी धुवून घ्या त्यानंतर ती उकळत्या पाण्यात टाका. त्यात आता दालचिनी पावडर टाका आणि १० मिनिट उकळू द्या.

उकळून झाल्यावर गॅस बंद करा आणि गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. आता त्यात चवीनुसार लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. तुमचा तमालपत्र टाकलेला चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे.

तेजपानाचा चहा शरीरात मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यास मदत करतो. हा चहा शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो. यासोबतच हा चहा तणावाची पातळी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. तेजपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

तेजपत्त्यात पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोह असते. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि हृदयरोगाशी लढण्यास देखील मदत करते. तेजपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात खूप मदत करते.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here