नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो चहा पिण्याची आपल्याला एवढी सवय लागून गेलेली असते कि चहा पिल्याशिवाय आपला दिवस जात नाही. मित्रानो जर तुम्हाला चहा सोडणं शक्य नसेल तर एक छोटासा बदल करा. या बदलाने चहा पिल्याने होणारे दुष्परिणाम कमी होतील तसेच गॅस आणि ऍसिडिटी पासून सुटका देखील मिळेल.
मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण जी चहा मध्ये साखर टाकतो ती साखर टाकणे बंद करा. साखरे ऐवजी आपण गूळ त्यात टाकायचा आहे. मित्रांनो साखर मुळातच आम्ल धर्मी आहे ऍसिडिक आहे.
मित्रानो आपण जेव्हा सकाळी चहा पितो तेव्हा आपल्या शरीरात आम्लच प्रमाण वाढले जाते. ऍसिडिक कन्टेन्ट आधीच आपल्या बॉडीच जास्त असत आणि त्यात जर आपण साखर युक्त चहा पिलो तर यात अजून जास्त वाढ होते.
आणि मग कफ, ऍसिडिटी, गॅसेस यांचे प्रमाण वाढते. तुम्ही साखरे ऐवजी जर गूळ मिसळला तर गूळ हा क्षारीय आहे.गूळ आपल्या शरीरात असलेले ऍसिड जे आधीपासूनच आहे त्याला नियंत्रित करणार आहे. तर मित्रांनो चहा मध्ये साखरे ऐवजी गूळ मिक्स करायचा आहे.
आता मित्रांनो आपण साखरेऐवजी गूळ वापरतोय त्यावेळी आपल्या चहामध्ये दूध मिक्स करता येणार नाही. दूध आणि गूळ यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. काही आजारांवर दूध आणि गूळ मिक्स केले तर चालत. तर आपण बिना दुधाचा चहा बनवायचा आहे.
साखर न टाकता आपल्याला काळा चहा म्हणजेच ब्लॅक टी तयार करायची आहे. गूळ घातलेली ब्लॅक टी. आता यात आपण जरासं लिंबू पिळायच आहे. जास्तीत जास्त अर्धा लिंबूरस त्यात मिक्स करू शकता.
हा जो आपण ब्लॅक टी बनवला आहे तो न्यूट्रीलाईज होईल. न्यूट्रीलाईज म्हणजे तो बेसिक सुद्धा नाही आणि ऍसिडिक सुद्धा नाही. आणि असा चहा पिल्याने होणारे तोटे हे कमीत कमी होणार आहेत.
असा चहा पिल्याने ऍसिडिटी, गॅसेस यापासून तुमची सुटका होणार आहे. तर मित्रांनो यापुढे साखरे ऐवजी गुळाचा वापर करा. आणि यात दूध मिक्स न करता त्यात अर्धा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे.
असा चहा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. आणि साखरेच्या चहा पासून होणारे नुकसान होतात ते सुद्धा टळतात. मित्रांनो विनंती आहे कि चहा पिणेच सोडून द्या. चहाचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात.
पण जर तुम्हाला खूपच सवय आहे चहाची आणि चहा पिणे सोडून देणे शक्य नाहीये तर वर सांगितल्या प्रमाणे चहा प्या.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.